---Advertisement---

इंग्लंडकडून पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू असूनही बिलिंग्सला मिळाली ७०० क्रमांकाची कॅप, वाचा त्यामागची ईनसाईड स्टोरी

Sam-Billings
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात सुरू असलेली ऍशेस मालिका (Ashes Series) अखेरीस आली आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होबार्ट येथे १४ जानेवारीपासून खेळला जात आहे. या सामन्यातून इंग्लंडचा यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स (Sam Billings) याचे कसोटी संघात पदार्पण झाले आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू (699 th England Player) ठरला आहे. तरीही पदार्पणाच्या सामन्यात त्याला इंग्लंड संघाकडून ७०० क्रमांकाची कॅप (700 Number Test Cap) देण्यात आली आहे. नक्की काय आहे यामागचे कारण?

त्याचे झाले होते असे की, जून २०२० मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ऍलन जोन्स (Alan Jones) यांना ६९६ क्रमांकाची कसोटी कॅप दिली होती. जून १९७० मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध विश्व एकादश संघात (England vs Rest Of World) एक अनधिकृत कसोटी सामना झाला होता. या सामन्यात ग्लॅमरगनचे सलमावीरी असलेले ऍलन यांनी इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्यावेळी या सामन्याला खरा कसोटी सामना असे गृहित धरले जात होते. याच कारणामुळे विश्व एकादश संघात सर गॅरी सोबर्स, रोहन कल्हई, ग्रॅमी पोलॉक, माईक प्रोक्टर, बॅरी रिचर्ड्स असे दिग्गज खेळाडू सहभागी होते.

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

परंतु दक्षिण आफ्रिकेच्या नियोजित कसोटी मालिकेची जागा घेणाऱ्या या मालिकेचा दर्जा पुढे आयसीसीने कमी केला. परिणामी ऍलन, जे पुन्हा इंग्लंडकडून एकही कसोटी सामना खेळले नाहीत, त्यांनी कसोटीपटू म्हणून आपले स्थान गमावले. मात्र ईसीबीने पुढे या न झालेल्या कसोटी सामन्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऍलन यांना अधिकृत कसोटी कॅप भेट देण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी झॅक क्राउलेनंतरही ६९६ क्रमांकाची कसोटी कॅप देण्यात आली.

अशाप्रकारे एक अतिरिक्त टोपी त्यांना देण्यात आल्याने सॅम बिलिंग्स हा इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू असला तरीही त्याला ७०० क्रमांकाची कसोटी कॅप मिळाली आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1481846038486990848?s=20

दरम्यान इंग्लंडच्या मातब्बर यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सला आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कसोटी स्वरुपात पदार्पण करण्यासाठी जवळपास ७ वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्याने २०१५ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमधून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर २५ वनडे आणि ३३ टी२० सामने खेळल्यानंतर त्याला कसोटीचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SAvsIND, 3rd Test, Live: चौथ्या दिवसाला सुरुवात, द.आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची, तर भारताला ८ विकेट्सची गरज

बिग ब्रेकिंग! टेनिसपटू नोवाक जोकोविचवर ओढावली संक्रात, ऑस्ट्रेलियन सरकारकडून व्हिसा दुसऱ्यांदा रद्द

“रिमेंबर द नेम, रिषभ पंत”, शतकी खेळीनंतर चाहते भलतेच खुश, दिल्या अशा प्रतिक्रीया

हेही पाहा-

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---