बुधवारी (२५ जुलै), विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान केले.
त्यानंतर, इम्रान खान यांनी १९९२ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचे ‘हु रुल्स द वल्ड’ हे थीम सॉंग पुन्हा एकदा एेकले.
याची माहिती पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन व्हिडिओ द्वारे देण्यात आली आहे
“पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणूकीत विजय मिळवण्याचा विश्वास असणारे इम्रान खान, पुन्हा एकदा १९९२ च्या विश्वचषकाचे थाम सॉंग ऐकत आहेत.” असे या ट्विटमध्ये व्हिडिओ बरोबर तेहरीक-ए-इंन्साफ पक्षाने लिहले होते.
In a mindset to win; Imran Khan in a psyched up mood 1992 style as he listens to the World Cup win song in his car after casting his vote this morning. It’s a once in a lifetime chance Pakistan. Don’t let it go. Step out to vote!#BallayPeThappa pic.twitter.com/GrShhlkEjv
— Tehreek-e-Insaf (@InsafPK) July 25, 2018
१९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विजेतेपद पटकावले होते.
६५ वर्षीय इम्रान खान पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ या रायकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
इम्रान खान यांनी १९९६ साली पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ या पक्षाची स्थापना करुन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली होती.
इम्रान खान यांनी १९९६ पासून आजपर्यंत पाकिस्तानच्या राजकारणावर मजल दर मजल करत चांगली पकड निर्माण केली आहे.
पाकिस्तानच्या या सार्वजनिक निवडणूकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ हा पक्ष विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
आज गुरुवारी (२६ जुलैला) या सार्वजनिक निवडणूकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.
यामध्ये इम्रान खान यांनी इस्लामाबादमधून निवडणूक जिंकत विजयी झाले आहेत.
तसेच या निवडणूकीचे कल यायला सुरवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ पक्षाने आघाडी घेतली आहे.
या निवडणूकीत तेहरीक-ए-इंन्साफने विजय प्राप्त केल्यास इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पतंप्रधान म्हणून विराजमान होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थोडक्यात बाचावला, दारुच्या नशेत गमावला असता जीव
-केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने