भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय वेगवान गोलंदाजांना कानमंत्र दिला आहे.
या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी आखूड टप्प्याचे चेंडू टाकणे टाळावे आणि चेंडूचा टप्पा पुढे ठेवण्याच्या प्रयत्न करावा. असे मत चेतन शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
“आजच्या जमान्यात वेग आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला कोणी घाबरत नाही. गोलंदाज म्हणून तुम्हाला प्रभाव पाडायचा असल्यास तुम्ही चेंडूचा टप्पा पुढे ठेवायला हवा. तसेच स्विंगही करायला हवा.”
“जगातील अनेक महान फलंदाजांची स्विंग गोलंदाजीसमोर भंबेरी उडते. त्यामुळे स्विंग गोलंदाजी केल्यानंतर अपयश येण्याचे काही कारण नाही.” असे चेतन शर्मा म्हणाले.
१९८६ साली इंग्लंड मध्ये भारताला प्रथमच कसोटी मालिका जिंकूण देण्यात चेतन शर्मा यांचे मोलाचे योगदान होते.
१९८६ साली तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेतन शर्मा यांनी दोन सामने खेळून १८.७५ च्या सरासरीने या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळवले होते.
या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते.
आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत
–आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये