Loading...

आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंड संघाला भारता विरुद्ध यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला आहे.

“या कसोटी मालिकेत अॅलिस्टर कुकची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि जो रुटच्या मोठ्या खेळी इंग्लंडसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.”

पुढे मायकेल वॉनने विराट कोहली आणि ब्रॉड-अँडरसन यांच्याविषयी सुद्धा या स्तंभातून मत व्यक्त केले.

“गोलंदाजीचा विचार केल्यास इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांसह खेळावे. तसेच ब्रॉड-अॅंडरसनने विराट कोहलीला फ्रंट फुटवर गोलंदाजी करावी. असे केल्यास विराटला रोखने शक्य होईल.” असे मायकल वॉन त्याने लिहलेल्या स्तंभात म्हणाला.

“एजबेस्टन असे मैदान आहे जिथे आपण पराभूत होत नाही. या मैदानावर ब्रॉड-अँडरसनला गोलंदाजी करायला आवडते. त्यामुळे या सामन्यात ते सर्वोत्तम गोलंदाजी करतील याची मला खात्री आहे.”

Loading...

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होत आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्याला १ ऑगस्टपासून बर्मिंघहमच्या एजबेस्टन मैदानावर प्रारंभ होत आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र

-टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का?

You might also like
Loading...