---Advertisement---

ट्रेंडिंगला फक्त एकच नाव, ते म्हणजे ‘शिवम’, वाचा IPL 2022 गाजवणाऱ्या दुबेबद्दल

Shivam-Dube
---Advertisement---

मध्यंतरी एक मराठी गाण आल होतं. गाण्यात बोल होते… “बातमी आपले चॅनलवर… जाहिरात आपली पेपरभर… वायरल आपण व्हाट्सअपवर… फेमस आपण फेसबुकवर…” सध्या अशीच परिस्थिती आहे शिवम दुबेची. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप, इंस्टाग्राम जिकडे पाहावे तिकडे फक्त शिवम दुबेचीच चर्चा होतेय. कारण, ठरली आयपीएल २०२२ मधील २२ वी मॅच. सीएसके आणि आरसीबी या जबरा फॅनबेस असलेल्या टीम्समधील ही मॅच शिवम दुबेने गाजवली आणि सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली.

डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून आयपीएल २०२२ मध्ये खेळायला उतरलेल्या सीएसकेची सुरुवात निराशाजनक झाली होती. चार मॅच गेल्या तरी पॉईंट्सचा भोपळा काही फुटला नाही. पाचव्या मॅचला मात्र रॉबिन उथप्पा आणि शिलम दुबेने वेगळच काहीतरी ठरवलं होतं. ३५ रनांवर दोन‌ विकेट गेल्यावर ही जोडी जमली.. आणि त्यांनी आरसीबीच्या बॉलिंगचे हालहाल केले. उथप्पाने ९ सिक्सचा पाऊस पाडला आणि ५० बॉलवर ८८ रन्सची इनिंग खेळून ‘विंटेज उथप्पा’ची आठवण करून दिली.

या सिझनला भलत्याच फॉर्ममध्ये दिसत असलेल्या शिवम दुबेनेतर आरसीबी बॉलर्सचा धागा खोलून ठेवला. स्टँड अँड डिलिव्हर बॅटिंग काय असते? याचे प्रात्यक्षिक त्याने दाखवले. सिराज, हेजलवूड, हसरंगा या सार्या इंटरनॅशनल स्टार्सला क्लब बॉलरसारखे धोपटत २०६ च्या स्ट्राईक रेटने ८ लंबे सिक्स आणि ५ फोर मारत त्याने नॉटआउट ९५ रन्स बनवल्या. लास्ट बॉलला सिक्स मारून शतक करायची संधी त्याच्याकडे होती, पण एकच रन निघाल्याने ती हुकली. तरीही त्याच्या या बँग बँग इनिंगचे कौतुक होतच राहिले.

हेही पाहा- रणजी ट्रॉफी टी२० सारखा खेळणारा मुंबईकर शिवम दुबे

आज ट्रेंडींगला असलेल्या शिवमचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास एखाद्या रोलर कोस्टर राईडप्रमाणे झालाय. शिवमला धष्टपुष्ट अंगकाठीच वरदान लाभलं, पण हीच अंगकाठी त्याची दुश्मन बनली. जास्त उंची आणि वजनामुळे त्याला अनेकदा त्रास व्हायचा.‌ त्यामुळे त्याने अखेर कंटाळून अवघ्या चौदाव्या वर्षी क्रिकेट न खेळायचा निर्णय घेतला. काही वर्षे अशीच गेली पण त्याच्यातील क्रिकेटचा किडा त्याला शांत बसू देत नव्हता. अखेर कॉलेजला असतानाच १९ व्या वर्षी त्याने पुन्हा क्रिकेट पॅड बांधायचे ठरवले. या काळात वडिलांनी त्याला खूपच मोटीवेट केले. ते म्हणाले पाचच वर्ष गेलेत ना, नो प्रॉब्लेम. तुझ्यातील क्रिकेट अजून काही संपले नाही. वडिलांच्या शब्दांनी जादू केली आणि शिवम मुंबईची मैदाने गाजवायला सज्ज झाला.

मुंबईत अंडर ९ पासून क्रिकेट खेळल जात. अनेकजण तिथून सुरुवात करून सीनियर टीमपर्यंत पोहोचतात, पण शिवमने डायरेक्ट एन्ट्री केली ती अंडर २३ संघात. मुंबईतील मानाची टी२० लीग असलेल्या मित्सुई शोजी टूर्नामेंट त्याने गाजवलेली. इथूनच मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये त्याचे नाव ओळखीचे बनले.

सन २०१८ मध्ये शिवम दुबे नावाचा डंका वाजला. तो रणजी ट्रॉफीमध्ये टी२० सारखा खेळला. मुंबई टी20 लीगच्या लीग मॅचमध्ये आता सध्या हवा असलेल्या प्रवीण तांबेला एकाच ओव्हरमध्ये त्याने पाच सिक्स लगावलेले. याच टूर्नामेंट फायनललाही त्याने लास्ट ओव्हरमध्ये ३० रन चेस करत आणलेले. नेमके त्याचवेळी २०१९ आयपीएलचा लिलाव काही दिवसांवर आला होता. शिवम मुंबईकडून रणजी खेळत होता. त्याच वेळी त्याने रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये एकाच ओवरला ५ सिक्स खेचत आयपीएलमध्ये आपले करोडो रूपये पक्के केले. आरसीबीने त्याला पाच कोटीची बोली लावली, पण तो फ्लॉप ठरला.

हार्दिक पंड्या एंजर्ड असल्याने त्याला टीम इंडियासाठी डेब्यू करण्याची संधी मिळाली.‌ बॅटिंगमध्ये तर त्याने कमाल केली, पण न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये रॉस टेलर आणि टीम सायफर्टने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये ३४ रन्स कुटून त्याच्या इंटरनॅशनल करिअरला स्वल्प विराम दिला.

पुढे राजस्थान रॉयल्ससाठी तो आयपीएल खेळला पण परफॉर्मंस ठीकठाक राहिला. बॅटिंगने कमावलेले तो बॉलींगने घालवत होता. २०२१ मध्ये त्याने लग्न उरकून घेतले. आपली मैत्रीण अंजुम खानशी त्याने लग्नगाठ बांधली. आयपीएल २०२२ लिलावात तो अनसोल्ड ‌ जाईल अशी भीती अनेकांना वाटत होती, पण मेगा ऑक्शन असल्याने त्याला मागणी दिसली. नवी टीम उभी करत असलेल्या सीएसकेने त्याला कोट्यावधी दिले. नेमकं याच दिवशी त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. चेन्नईने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आता तो सार्थ करून दाखवतोय.

त्याची अशी बॅटिंग बघून अनेक जण म्हणतायेत… “बाबा ते ऑलराऊंडर होण्याचं खूळ डोक्यातून काढ आणि फिनिशर बन फिनिशर. गरज आहे तुझी टीम इंडियाला, आणि हो सिझनला गंडलेल्या सीएसकेलाही.”

रणजी ट्रॉफी टी२० सारखा खेळणारा मुंबईकर शिवम दुबे । Shivam Dube । IPL२०२२

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे

धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?

चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---