पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेमधील दिग्गज खेळाडू शहजाद आजम राणा याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याचे वय अवघे 36 वर्ष होते. एवढ्या कमी वयात या क्रिकेटपटूला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो इस्लामाबाद संघाचे मोठ्या काळापासून प्रतिनिधित्व करत आला होता.
शहजाद आजम राणा (Shahzad Azam Rana) याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 95 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 1494 धावा केल्या. या सामन्यांमधील त्याची गोलंदाजी पाहिली, तर 388 विकेट्सची नोंद त्याच्या नावपुढे आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये त्याने इस्लामाबाद संघाविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये शहजादने लाहोर संघाविरुद्धच शेवटचा प्रथम श्रेणी सामना देखील खेळला.
Shocked to hear the passing of first class cricketer 36 yrs old Shahzad Azam Rana of cardiac arrest.
May Allah give him highest rank in Jannah. Ameen pic.twitter.com/GjEAZvhudU— Zakir Khan (@QEATrophy) September 30, 2022
वेगवान गोलंदाज शहजादने देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये 29 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 27 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना 126 धावाही केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये शहजादने 58 सामने खेळले आणि यामध्ये 81 विकेट्स घेतल्या. 2018 नंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नाहीये. त्याने मैदानात खेळलेला शेवटचा सामना 2020 पाहिला गेला. त्यावेळी मेरिलबोन क्रिकेट क्लब पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्यांच्यासोबतच्या एका सामन्यात शहजाद खेळला होता. नार्दन (पाकिस्तान) विरुद्ध मेरिलबोन क्रिकेट क्लब यांच्यातील या सामन्यात त्याने चार षटके गोलंदाजी केली आणि 30 धावा खर्च करून एक विकेट घेतली होती.
पाकिस्तानी क्रिकेटपटूचे निधन एवढ्या कमी वयात झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियावर शहजादच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री






