---Advertisement---

कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!

On: शनिवार, जून 23, 2018 1:12 PM
---Advertisement---

भारतीय क्रिडा रसिकांना कायमच भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांनी उत्सुकता असते. मग तो सामना क्रिकेटचा असो नाहीतर कबड्डीचा.

या भारतीय चाहत्यांमध्ये असा एक चाहता आहे की तो पाकिस्तानला डिवचण्याची एकही संधी गमावत नाही.

तो म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग. जवळपास 15 वर्षे क्रिकेट मैदान गाजवलेला विरेंद्र सेहवाग आता सोशल मिडीया गाजवतोय.

ट्वीटरच्या माध्यमातून कायमच चर्चेत असणारा सेहवाग आता पुन्हा चर्चेत आला आहे.

काल दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 36-20 अशा फरकाने पराभव केला.

याचेच औचित्य साधून सेहवागने एक ट्वीट केले.

“कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात पाकिस्तानला पराभूत केल्याबद्दल अभिनंदन. सामना पाहून मजा आली.” असे सेहवाग त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.

सेहवागच्या या ट्वीटला पाकिस्तानी चाहत्यांनी प्रत्युत्तरही दिले आहे.

https://twitter.com/shahmir234/status/1010195387280429057?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-virender-sehwag-tweets-mazza-aa-gaya-after-india-beat-pakistan-in-kabaddi-2029380.html

एका पाकिस्तानी चाहत्याने सेहवागला 2017च्या चॅम्पीयन्स ट्रॉफिच्या अंतिम सामन्याच्या धावफलकाचा फोटो टाकून ट्रोल केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही आहे आनंदाची बातमी

Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment