भारत हा एकापेक्षा एक युवा क्रिकेटपटूंची खाण आहे. हे युवा खेळाडू आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावताना दिसत आहेत. या खेळाडूंमध्ये रिंकू सिंग या जबरदस्त फलंदाजाचाही समावेश आहे. रिंकू सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याची टी20 कारकीर्दीत दुहेरी धावसंख्या करण्याची मालिका खंडित झाली.
रिंकूने पहिल्यांदाच केली एकेरी धावसंख्या
रविवारी (दि. 3 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) संघ आमने-सामने आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रिंकू सिंग (Rinku Singh) याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने यादरम्यान 8 चेंडूंचा सामना करताना फक्त 6 धावा केल्या. यावेळी त्याच्या बॅटमधून एक चौकारही निघाला.
यामुळे झाले असे की, रिंकूची आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील प्रत्येक सामन्यात दुहेरी धावसंख्या करण्याची मालिका खंडित झाली. त्याने आतापर्यंत टी20 कारकीर्दीत भारताकडून 10 सामने खेळले आहेत. यापैकी 5 डावात खेळताना त्याच्या बॅटमधून पाचही वेळा दुहेरी धावसंख्या आली होती, पण आता सहाव्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याला फक्त 6 धावा करता आल्या. त्यामुळे त्याची दुहेरी धावसंख्या करण्याची मालिका खंडित झाली.
Rinku Singh last 6 T20I innings:
Double Digit
Double Digit
Double Digit
Double Digit
Double Digit
Single Digit pic.twitter.com/nUsIpQWFGF— Broken Cricket (@BrokenCricket) December 3, 2023
रिंकूने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीत 10 सामन्यातील 6 डावात फलंदाजी करताना 60च्या सरासरीने आणि 187.50च्या स्ट्राईक रेटने एकूण 180 धावा केल्या आहेत.
रिंकूची टी20 मालिकेतील कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील रिंकूची कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 5 सामन्यातील 4 डावात फलंदाजी करताना 52.50च्या सरासरीने आणि 175च्या स्ट्राईक रेटने एकूण 105 धावा केल्या आहेत. (Streak broken for Rinku Singh this is first time happening with him in his T20I career)
हेही वाचा-
अर्रर्र! विराटचा मोठा रेकॉर्ड मोडता-मोडता वाचला, ऋतुराजला कमी पडल्या फक्त 9 धावा
Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’






