बेंगलोर | वयाच्या 21 व्या वर्षी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला भारतीय पुरुष हॉकी संघाचा युवा फॉरवर्ड गुरसहीबजित सिंगकडे भविष्यातील एक स्टार हॉकीपटू म्हणून पाहिजे जात आहे. सन 2019 मधील 28 व्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत वरिष्ठ संघाकडून पदार्पण केल्यापासून गुरसाहिबजीतने आतापर्यंत एकूण 6 गोल नोंदवले आहेत.
गेल्या दोन वर्षांत गुरसाहिबजीत भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे, विशेष म्हणजे ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेत ऑगस्ट 2019 मध्ये टोकियो येथे या युवा खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन गोल केले होते. या खेळासाठी आपण मजबूत असणे आवश्यक आहे, असा त्याचा विश्वास आहे.
राष्ट्रीय संघाचा भाग होईल असे वाटले नव्हते -गुरसाहिबजीत
स्वभावाने महत्त्वाकांक्षी असलेल्या गुरसाहिबजीतला आपल्या कारकिर्दीची सुरूवात सकारात्मक झाली असे वाटते. त्याच्या या खेळाच्या प्रवासाबद्दल सांगताना गुरसाहिबजीत म्हणाला की, “जेव्हा मी लहान वयात पंजाबच्या गुरदासपूर येथे हॉकी खेळत होतो, तेव्हा मला वाटले नाही की एक दिवस मी राष्ट्रीय संघाचा भाग होईन. मी खेळायला सुरुवात केली कारण मला हा खेळ आवडत होता. परंतु तो व्यावसायिकपणे खेळेन याची मला खरंच खात्री नव्हती. तथापि, नशिबाने हे घडवून आणले होते. मला हळू हळू खेळाविषयी बर्याच तांत्रिक गोष्टी समजल्या, ज्यामुळे माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करू शकलो.”
…तर शारीरिक शक्ती महत्वाची
गुरसाहिबजीतचा असा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय स्ट्राइकरसाठी शारीरिक शक्ती महत्वाची भूमिका निभावते. “पूर्वी आमच्याकडे अचूक कौशल्य असलेले खेळाडू असत, जे बचावपटूंना चकवून गोल करत असत. परंतु माझा असा विश्वास आहे की गेल्या काही वर्षांत हॉकीमध्ये बरेच बदल झाले आहेत. आधुनिक हॉकीमध्ये जर आपण स्ट्राइकर किंवा आक्रमण खेळाडू आहात, तर आपण शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे महत्वाचे आहे. सामर्थ्य आणि बळकट स्नायू या काही गोष्टींवर मी गेल्या काही महिन्यांपासून काम करण्याचा प्रयत्न करीत आहे,” असेही गुरसाहिबजीतने पुढे बोलताना सांगितले
महत्त्वाच्या बातम्या –
“मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंगकडून बरेच काही शिकलो”, भारतीय युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया
हॉकी इंडियाला मिळाला ईशान्य भारतातील पहिलाच अध्यक्ष; ‘या’ व्यक्तीची झाली बिनविरोध निवड