इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) दुसरा टप्पा यूएईमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे २९ सामन्यांनंतर लीग स्थगित करावी लागली होती. यातून धडा घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडक हेल्थ अँड सेफ्टी प्रोटोकॉल जारी केले आहेत. यावेळी कोरोनामुळे लीगमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी, खेळाडू, सपोर्टिंग स्टाफ आणि इतर सदस्यांना प्रोटोकॉलचे कडक पालन करावे लागेल. मात्र, असे असूनही, एखादा खेळाडू, सपोर्ट स्टाफचा सदस्य किंवा इतर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास काय करायचे? यासाठी बीसीसीआयने स्पष्ट मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
असे असतील नियम
बीसीसीआयच्या हेल्थ अँड सेफ्टी प्रोटोकॉलअंतर्गत, जर यूएईमध्ये एखादा खेळाडू किंवा इतर कोणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले तर त्यांना किमान १० दिवसांसाठी विलगीकरणामध्ये जावे लागेल. या काळात, संक्रमिताची ९ आणि १० व्या दिवशी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी होईल. ही चाचणी नकारात्मक आल्यानंतरच, खेळाडूला पुन्हा संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश कसा मिळेल.
याशिवाय, संक्रमितामध्ये कोणतीही लक्षणे दिसू नयेत आणि औषधे बंद झाल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त असावी. हे सर्व नियम पूर्ण केल्यानंतरच खेळाडू पुन्हा बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकेल. यासोबतच, संक्रमितामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत पाहिजे तसेच, त्याने औषधोपचार बंद केल्यानंतर एक दिवस उलटायला हवा.
आयपीएलसाठी एकूण १४ बायो-बबल तयार करण्यात येणार आहेत. यापैकी ८ संघांसाठी, ३ पंच व सामधिकारी यांच्यासाठी आणि उर्वरित तीन ब्रॉडकास्टर आणि समालोचकांसाठी असतील.
या दिवशी सुरू होणार आयपीएलचा दुसरा टप्पा
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुबईमध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी दुबईतच होणार आहे. सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स ६ सामने जिंकून पहिल्या स्थानावर असून, सीएसके दुसऱ्या आणि आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वेळी देखील यूएईमध्ये लीग आयोजित करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण
शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलेल्या खेळाडूंचे विराट कोहलीने वाढवले मनोधैर्य; म्हणाला…