---Advertisement---

सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धा: कॉन्स्टलेशन चिताज, मॅट्रिक मार्व्हल्स अंतिम फेरीत

On: शनिवार, जानेवारी 28, 2023 4:34 PM
Success-Strikers
---Advertisement---

मॅट्रिक मार्व्हल्स आणि कॉन्स्टलेशन चिताज संघांनी येथे सुरू असलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली. मोशी येथील सिटी स्पोर्टस एरेना येथे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १५ वर्षांखालील गटात कॉन्स्टलेशन चिताज संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांनी प्रथम प्रतिक ढवळे, अर्णव पाटीलच्या गोलच्या जोरावर टीएमपी टायगर्स संघाचा २-१ असा पराभव केला.

टायगर्सकडून एकमात्र गोल आरव वानखेडेने नोंदवला. त्यानंतर अर्णव बोराटेने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर चिताज संघाने जीएनएस गनर्सचा १-० असा पराभव केला. मात्र, पहिल्या सामन्यात त्यांना मॅट्रिक मार्व्हल्सकडून २-० असा पराभव पत्करावा लागला होता. शिवम पाटील, देवेंद्र सिंगने गोल केले.

मॅट्रिक मार्व्हल्स संघाने अन्य सामन्यात जीएनएस गनर्स संघाचा ४० अस धुव्वा उडवला. अस्मित दास, देवेंद्र सिंग, शिवम पाटील, पियुष दांगट यांनी गोल केले.

स्पर्धेतील १५ वर्षांवरील गटात सक्सेस स्ट्रायकर्स संघाने अखेरच्या दिवशी वर्चस्व राखले आणि बाद फेरीत अशक्य वाटणारा प्रवेश शक्य करून दाखवला. अवघ्या एका गोलच्या फरकाने सक्सेस संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

सक्सेसने पहिल्या साम्नयात आदित्यऑल स्टार्सचा ३-१ असा पराभव केला. नंतर त्यंनी प्रबळ पॅंथर्सवर १-० अशी मात केली. (Strikers, Marvels make it to the summit clash)

निकाल-
१५ वर्षांखालील : मॅट्रिक मार्व्हल्स २ (शिवम पाटील १३वे, देवेंद्र सिंग १७वे मिनिट) वि. वि. कॉन्स्टलेशन चिताज ०
टीएमपी टायगर्स १ (आर्यन मासुळकर १०वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०
कॉन्स्टलेशन चिताज २ (प्रतिक ढवळे १५वे मिनिट,अर्णव पाटील२१वे मिनिट) वि.वि. टीएमपी टायगर्स १ (आरव वानखेडे ५वे मिनिट)
मॅट्रिक मार्व्हल्स ४ (अश्मित दास ७ वे, देवेंद्र सिंग १३वे मिनिट, पियुष दांगट १५वे मिनिट, शिवम पाटील १७वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०
कॉन्स्टलेशन चिताज १ (अर्णव बोराटे १६वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०
मॅट्रिक मार्व्हल्स १ (शिवम पाटील ८वे मिनिट, वि. वि. टीएमपी टायगर्स ०
१५ वर्षांवरील – ज्योती जग्वॉर्स १ (गणेश आवळे १४वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स ०
सक्सेस स्ट्रायकर्स ३ (स्वप्नील महामुनी ११वे मिनिट, किरण गायकवाड १६वे मिनट,अमित जरे २३वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स १(सौरिन ७वे मिनिट)
सक्सेस स्ट्रायकर्स १ (अमित जरे ७वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स ०
ज्योती जग्वॉर्स २ (राजवर्धन देशमुख ८वे, १९वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स १ (वरुण लाड १२वे मिनिट)
आदित्य ऑलस्टार्स २ (माधव अभय १०वे मिनिट, वरुण लाड १९वे मिनिट) वा.वा. प्रबल पँथर्स १ (रितेश बाबर ६वे मिनिट)
ज्योती जग्वॉर्स १ (राजवर्धन देशमुख १२वे मिनट) बरोबरी वि. सक्सेस स्ट्रायकर्स १ (अमित जरे १८वे मिनिट)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई सिटी एफसीचा रेकॉर्ड! सलग 16 सामन्यांत अपराजित अन् मोडला सर्वाधिक गोल्सचा विक्रम
सेव्हन अ साईड फुटबॉल | स्ट्रायकर्स १३ वर्षांखालील गटातून अंतिम फेरीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---