---Advertisement---

जेव्हा स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आज (०३ जून) आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने ३० ऑगस्ट २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसे पाहायला गेले तर बिन्नी भारतीय संघाकडून जास्त क्रिकेट खेळला नाही. मात्र त्याच्या कारकिर्दीत एक असा सामना झाला, जो त्याच्यासाठी कमालीचा अविस्मरणीय सामना होता. त्या सामन्यात त्याने एक विक्रम प्रस्थापित केला होता. जो भारताच्या क्रिकेट इतिहासात नेहमी लक्षात ठेवला जाईल.

बिन्नीने ७ वर्षांपूर्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली होती. भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा १७ जून २०१४ साली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात बिन्नीने उत्कृष्ट गोलंदाजी करत एक विक्रम प्रस्थापित केला. ढाकाचे ते मैदान गोलंदाजीसाठी पूरक होते. त्यामुळे नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर त्यांनी साजेशी कामगिरी देखील केली होती.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने त्या सामन्यात तब्बल ५ विकेट घेतल्या होत्या. तो सामना ४१ षटकांचाच होता. मात्र, भारतीय संघ केवळ २५.३ षटकच खेळू शकला. ज्यात भारतीय संघाने १०५ धावा केल्या. त्या सामन्यात कर्णधारपद भूषवत असलेल्या सुरेश रैनाने सर्वाधिक २७ धावा केल्या, तर रॉबिन उथप्पाने १४ आणि चेतेश्वर पुजाराने ११ धावा केल्या होत्या. इतर कोणताही भारतीय फलंदाज या सामन्यात चांगल्या धावा करु शकला नव्हता.

नंतर, फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशसाठी मिळालेले लक्ष्य त्यांनी सहज गाठले असते; मात्र, भारतीय गोलंदाजांनी देखील त्या सामन्यात दमदार कामगिरी केली. स्टुअर्ट बिन्नी केवळ ४.४ षटक टाकल्या ज्यातील २ षटके निर्धाव (मेडन) टाकले होते, आणि केवळ ४ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

तसेच भारतीय गोलंदाज मोहित शर्माने देखील या सामन्यात २२ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. या दोघांच्या आक्रमक गोलंदाजीमुळे बांगलादेशचा संघ १७.४ षटकांमध्ये केवळ ५८ धावाच बनवू शकला. अशा तऱ्हेने भारतीय संघाने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार ४७ धावांनी जिंकला होता.

Stuart Binny's magical spell

३७ वर्षीय अष्टपैलू खेळाडू असलेल्या बिन्नीने भारतीय संघाकडून केवळ ६ कसोटी सामने खेळले आहेत. तर १४ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये देखील त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच प्रथम श्रेणीमध्ये बिन्नीने ९५ सामन्यात ३४.२५ च्या सरासरीने ४७९६ धावा केल्या होत्या. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १०० सामन्यात २५.५४ च्या सरासरीने १७८८ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

मराठीत माहिती- क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी

लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर

IREvIND। आयपीएलमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ तिघांना मिळू शकते टीम इंडियात संधी, यादीत अविश्वसनीय नावांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---