---Advertisement---

ब्रॉडची आणखी एक सुवर्णाक्षरी कामगिरी! मॅकग्राला मागे टाकत चढला यशाच्या शिखरावर

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 8:23 PM
Stuart-Broad
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर खेळला जातोय. सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याला बाद करत आपल्या कारकीर्दीतील मैलाचा दगड पार केला. ब्रॉड आपला सहकारी जेम्स अँडरसन याच्यानंतर सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला.

आपल्या कसोटी कारकिर्दीतील 159 वा कसोटी सामना खेळत असलेल्या ब्रॉडने या कसोटीतील पहिल्या डावात चार बळी मिळवलेले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या 563 कसोटी बळींची बरोबरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याला बाद करत त्याने आपल्या कसोटी बळींची संख्या 564 केली. आता तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला. या यादीमध्ये त्याचाच संघसहकारी जेम्स अँडरसन 666 बळींसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. विशेष म्हणजे अँडरसनही या सामन्यात खेळतोय.

‌‌आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांचा विचार करायचा झाल्यास श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न 706 बळींसह दुसऱ्या व भारताचा अनिल कुंबळे 619 बळींसह चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ख्रिस ब्रॉड यांचा पुत्र असलेल्या स्टुअर्टने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले. तर 2007 मध्ये त्याला कसोटी पदार्पणाची संधी दिली गेली होती. 2016 मध्ये त्याने टी20 व वनडे क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्याने केवळ कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

Asia Cup 2022 Final: पाकिस्तानने टॉस जिंकून अर्धा सामना घातला खिशात! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---