इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने नववर्षाची शानदार सुरुवात केली आहे. त्याने १ जानेवारी रोजी त्याची प्रेयसी मॉली किंग हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. ही जोडी २०१२ पासून एकमेकांना डेट करत आहे. अनेक चढ-उतारांचा सामना केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या नात्याला नवे नाव दिले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी सर्वांना याविषयी माहिती दिली आहे.
स्टुअर्टने सोशल मीडिया अकाउंटवर मॉलीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “२०२१ ची सुरुवात करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत.” सोबतच त्याने आपली प्रेयसी मॉली किंग हिला टॅग केले आहे आणि अंगठीचा इमोजी टाकला आहे.
The best way to start 2021 @MollieKing 💍💫 pic.twitter.com/tCb0H6cr4I
— Stuart Broad (@StuartBroad8) January 1, 2021
स्टुअर्टची प्रेयसी मॉली हिनेही दोघांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले की, “एक हजार वेळा हो! माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, नव्या वर्षाची जादुई सुरुवात! मी तुझ्यासोबत माझ्या आयुष्याची सगळी वर्षे घालवण्यासाठी तयार आहे.”
https://www.instagram.com/p/CJgxCzFgb3f/?utm_source=ig_web_button_share_sheet
स्टुअर्ट आणि मॉली यांच्या साखरपुड्यानंतर इंग्लंडच्या कित्येक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात मायकल वॉन, ख्रिस वोक्स, डॅरेन गोफ यांसह बऱ्याच क्रिकेटपटूंचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, ३४ वर्षीय स्टुअर्टला नुकताच स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द ईयर म्हणून नामांकित करण्यात आले होते. परंतु फॉर्म्युला १ कार रेसिंग स्टार सर लुईस हॅमिल्टन याने त्याला पराभूत केले.
स्टुअर्ट ब्रॉडची क्रिकेट कारकिर्द
स्टुअर्टच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलयाचे झाले तर, त्याने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १४३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५१४ विकेट्स आणि ३३३५ धावांची कामगिरी केली आहे. तसेच १२१ वनडे सामन्यात १७८ विकेट्स आणि ५२९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये ५६ सामने खेळत ६५ विकेट्स आणि ११८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार
याला म्हणतात प्रतिभा! केवळ १२ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हॅट्रिक घेणारा क्रिकेटर