---Advertisement---

वॉर्नरची पाठ सोडण्याच्या विचारात नाही इंग्लिश गोलंदाज! कसोटीत 15 वेळा केली शिकार

On: शनिवार, जून 17, 2023 6:52 PM
David Warner
---Advertisement---

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ऍशेस 2023मध्येही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे झटके बसले. या दोन्ही विकेट्स स्टुअर्ट ब्रॉडने घेतल्या होत्या, त्यादेखील लागोपाठ चेंडूंवर. याचदरम्यान डेविड वॉर्नर विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड असा सामनाही पाहायला मिळाला. वॉर्नर मात्र यावेळीही अपयशी ठरला.

आपल्या कसोटी कारकिर्दीत स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने एकाद्या फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद केले असेल, तर तो दुसरा कोणी नसून डेविड वॉर्नर (David Warner) आहे. वॉर्नर तब्बल 15 कसोटी डावांमध्ये ब्रॉडच्या चेंडूवर बाद झाला आहे. 2019 नंतर म्हणजे मागच्या चार वर्षांच्या काळात ब्रॉडने तब्बल 10 वेळा वॉर्नरची विकेट काढली आहे. यादरम्यान वॉर्नरने ब्रॉडचे एकूण 207 चेंडू खेळले आणि त्यापैकी 178 चेंडू निर्धाव होते. वॉर्नरच्या बॅटमधून दरम्यानच्या काळात 7.30च्या सरासरीने 73 धावा केल्या आहेत.

ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद केलेल्या खेळाडूंची यादी पाहिली, तरत पहिल्या क्रमांकावर वॉर्नरनेच नाव आहे. दुसऱ्या क्रमांकावर मायकल क्लार्क (Michael Clarke), ज्याला ब्रॉडने 11 वेळा बाद केले. तिसऱ्या क्रमांकावीर रॉस टेलर (Ross Taylor) 10 कसोटी डावांमध्ये ब्रॉडची शिकार बनला होता. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि टॉम लॅथम (Tom Latham ) आहेत. या दोघांनीही 10 कसोटी डावांमध्ये ब्रॉडच्या चेंडूवर विकेट गमावली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध सर्वाधिक वेळा विकेट गमावणारे क्रिकेटपटू
15 – डेविड वॉर्नर
11 – मायकल क्लार्क
10 – रॉस टेलर
10 – एबी डिविलियर्स
10 – टॉम लॅथम

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने आपल्या तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. संघाची धावसंख्या 29 अशताना डेविड वॉर्नर (9) आणि मार्नस लाबुशेन (0) यांनी विकेट्स गमावल्या. तिसरी विकेट स्टीव स्मिथची होती, जेव्हा संघ 67 होती. स्मिथने वैयक्तिक 16 धावा केल्या. (Stuart Broad has dismissed David Warner for the record 15th time in Test )

महत्वाच्या बातम्या –
VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स
“भारतीय खेळाडू पंचांवर दबाव टाकतात”, नितिन मेनन यांचा धक्कादायक आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---