---Advertisement---

“भारतीय खेळाडू पंचांवर दबाव टाकतात”, नितिन मेनन यांचा धक्कादायक आरोप

On: शनिवार, जून 17, 2023 5:26 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर पंचांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. खेळ योग्य पद्धतीने खेळला जावा ही जबाबदारी पंच निभावतात. यामध्ये अनेक वेळा चुकीचे निर्णय देखील दिले जातात. आता आयसीसी एलिट पॅनलमध्ये असलेले भारताचे एकमेव पंच नितीन मेनन यांनी केलेल्या एका खुलासामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट भारतीय खेळाडू सामन्यावेळी दबाव आणतात असे म्हटले. ‌

मेनन हे मागील काही काळापासून आयसीसी एलिट पॅनलमध्ये असलेले एकमेव भारतीय पंच आहेत. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. एस रवी यांच्यानंतर या प्रतिष्ठेच्या मालिकेत पंचगिरी करण्याचा मान त्यांना मिळेल. तत्पूर्वी त्यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी भारतीय खेळाडूंवर एक मोठा आरोप केला. ते म्हणाले,

“भारतामध्ये खेळताना अनेकदा असे होते की, भारतीय खेळाडू आमच्यावर दबाव आणतात. भारतातील काही सुप्रसिद्ध खेळाडू अनेकदा 50-50 अशी शक्यता असलेले निर्णय आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पंच म्हणून तुम्हाला असा दबाव झेलता यायला हवा. त्यानुसार तटस्थ राहून निर्णय देणे गरजेचे असते.”

मेनन मागील दोन वर्षाच्या काळात भारतातील सर्वात कम पंच म्हणून पुढे आले आहेत. पंच म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा विचार केल्यास 18 कसोटी, 44 वनडे व 40 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. पंच होण्याआधी त्यांनी मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळलेले. तसेच त्यांचे वडील नरेंद्र हे देखील राष्ट्रीय स्तरावरील पंच राहिले आहेत.

(Umpire Nitin Menon Said Star Indian Cricketers Pressurized In Indian Match)

महत्वाच्या बातम्या –
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---