---Advertisement---

IND vs ENG: जर भारताने असं केलं, तर इंग्लंडचा पराभव निश्चित, ‘या’ माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य!

On: शनिवार, जून 21, 2025 3:20 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. यशस्वी जयस्वाल (101) आणि शुबमन गिल (127*) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 3 गडी गमावत 359 धावा केल्या आहेत. (India score 359/3 Leeds Test) भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मोठी भविष्यवाणी केली आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. राहुलने 42 धावा केल्या आणि तो बाद झाला, तर जयस्वालने इंग्लंडमध्ये आपले पहिले कसोटी शतक झळकावले. भारतीय कर्णधार शुबमन गिलने (127) देखील इंग्लंडमध्ये आपले पहिले शतक झळकावले आणि रिषभ पंत (67) सोबत चौथ्या विकेटसाठी 138 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताचा डाव भक्कम केला. दिवसाच्या अखेरीस भारताने 359/3 अशी धावसंख्या उभारली.

जिओहॉटस्टारवरील एका चर्चेत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, “पहिल्या दिवशी इंग्लंडला 5 किंवा 6 विकेट्स मिळतील, अशी अपेक्षा होती, त्यामुळे एक चांगली सुरुवात झाली असती. पण खेळपट्टी खूपच चांगली होती आणि भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने गतीवर नियंत्रण मिळवले, ते जबरदस्त होतं. लंचच्या वेळेस काहीसा उतार-चढाव होता. ब्रेकच्या अगोदर 2 गडी बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला आशा निर्माण झाली होती आणि कदाचित भारतीय संघावर थोडासा दबावही आला होता. पण लंचनंतर जयस्वाल आणि कर्णधार गिलने डाव सावरला आणि परिस्थिती हाताळली.” (Stuart Broad on India batting)

ब्रॉड पुढे म्हणाला, “ही एक तरुण फलंदाजी लाईनअप आहे, पण त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि परिपक्वतेने फलंदाजी केली. त्यांनी गोलंदाजांना खूप मेहनत करायला लावली आणि एकही विकेट सहज दिली नाही. हे भारताचं वर्चस्व असलेले शानदार पर्व होते.”

ब्रॉड म्हणाला, “इंग्लंडला आता खूप काही विचार करावं लागेल. आता त्यांच्यावर दबाव आहे, कारण जर भारताने 550 किंवा 600 धावा केल्या, तर हा सामना त्यांच्या हातातून निसटू शकतो.”

शेवटी ब्रॉड म्हणाला, “भारतीय फलंदाजांनी चेंडूला अत्यंत अचूक वेळ साधत खेळलं, विशेषतः जयस्वाल आणि केएल राहुलने. त्यांनी चेंडू उशिरा खेळला आणि स्विंग होऊ दिला. जेव्हा तुम्ही हायलाइट्स पाहाल, तेव्हा एकामागून एक शानदार ड्राईव्ह दिसतील, ज्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी खराब वाटेल, पण हे फलंदाजीचं उत्कृष्ट उदाहरण होतं.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---