Loading...

५५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्यापासून स्टुअर्ट ब्रॉड केवळ ३ विकेट्स दूर

आजपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना हेडींग्ले, लीड्स येथे होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात ब्रॉडने 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो हेडिंग्ले क्रिकेट स्टेडीयमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. तसेच तो इंग्लंडचे माजी गोलंदाज फ्रेड ट्रुमन यांच्या 55 वर्षांच्या विक्रमालाही मागे टाकेल.

ट्रुमन यांनी 1952-65 या कालावधीत खेळताना हेडिंग्ले येथे 9 कसोटी सामन्यात 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी हेडिंग्ले स्टेडीयमवर शेवटची कसोटी जूलै 1964 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली होती.

ब्रॉडने हेडिंग्ले स्टेडीयममध्ये खेळताना आत्तापर्यंत 9 कसोटी  सामन्यात 42 विकेट्स घेतल्या आहेत.

सध्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडीयमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत ट्रुमन आणि ब्रॉड पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर 40 विकेट्ससह बॉब विल्स आहे, तर चौथ्या क्रमांकावर 39 विकेट्ससह जेम्स अँडरसन आहे. 

Loading...

हेडिंग्ले क्रिकेट स्टेडीयमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज –

44 – फ्रेड ट्रुमन (9 सामने)

42 – स्टुअर्ट ब्रॉड (9 सामने)

40 – बॉब विल्स (8 सामने)

39 – जेम्स अँडरसन (10 सामने)

33 – इयान बॉथम (10 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

‘कॅप्टनकूल’ धोनीच्या त्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची कर्णधार कोहलीला संधी

भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विंडीजला मोठा धक्का!

भारत-विंडीज संघात आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीबद्दल सर्वकाही…

You might also like
Loading...