मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल२०२० मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अबू धाबी येथे झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला आर्चरचा वेगवान बीमर डोक्याला लागण्यापासून थोडक्यात वाचला.
झाले असे की १९ व्या षटकाच्या पहिला चेंडू टाकताना आर्चरच्या हातून तो चेंडू निसटला आणि थेट पंड्याच्या डोक्याला लागणार होता. पण पंड्या लगेचच खाली झुकला. त्यावेळी तो चेंडू यष्टीरक्षक जॉस बटलरलाही पकडता आला नाही, यामुळे चेंडू थेट सीमारेषेपार गेला. या चेंडूची गती १५२ किलोमीटर प्रतीतास इतकी होती. हा चेंडू अशा प्रकारे सुटल्याने आर्चरनेही हात उंचावत लगेचच माफी मागितली. हा चेंडू पंचांनी नो बॉल ठरवला.
Jofra Archer to Hardik Pandya
#IndianPremierLeague #MI #RRvsMI #MIvRR #Hardik #Jofra #Dream11IPL pic.twitter.com/dZFrQlcrGF— Sayantika Biswas (@Innocent_sayo) October 6, 2020
Jofra Archer coming for Hardik Pandya's headtop!🤯 #IPL2020 #RRvMI pic.twitter.com/888lSLa05K
— Rav (@rav23ldn) October 6, 2020
या चेंडूबद्दल इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपले मत मांडले आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘पंड्याने हा चेंडू शानदार खेळला. मला वाटत नाही की कोणताही गोलंदाज जाणूनबुजून असा चेंडू टाकतो.’
He’s played that brilliantly. I don’t think any bowler ever means these… https://t.co/Kjje5wkSH0
— Stuart Broad (@StuartBroad8) October 6, 2020
याच षटकात आर्चरचा एक चेंडू मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवच्या हेल्मेटवरही जोरदार आदळला होता. सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नाही.
या सामन्यात मुंबईनी प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ धावा केल्या होत्या आणि राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला १८.१ षटकात सर्वबाद १३६ धावाच करता आल्या. आर्चरने गोलंदाजी करताना १ विकेट घेतली होती.