---Advertisement---

कारकिर्दीतील शेवटच्या दिवशी ब्रॉड पुन्हा करणार ‘हे’ काम! शेअर केली भावूक पोस्ट

Stuart broad
---Advertisement---

ऍशेस 2023 चा शेवटचा दिवस स्टुअर्ट ब्रॉड याच्यासाठीही खास आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा ऍशेस कसोटी सामना सध्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. स्टुअर्ट ब्रॉड याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील हा शेवटचा सामना, असल्याचे त्याने शनिवारी (29 जुलै) घोषित केले होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (31 जुलै) ब्रॉडने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

ऍशेस 2023मध्ये पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने, तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलिया 1-2 अशा आघाडीवर आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी इंग्लंडचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. तसेच स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याला शानदार निरोप देण्याचा प्रयत्न संघाचा असेल. सोमवारी मैदानात उतरण्याआधी स्टुअर्ट ब्रॉड देखील चांगले प्रदर्शन करण्याच्या हेतूने खेळणार हे स्पष्ट झाले.

ब्रॉडने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट शेअर केली की, “मी नेहमीच मैदानात सर्वकाही गमावण्याच्या तयारीने खेळत असतो. आज माझ्याकडे असे करण्याची शेवटची संधी आहे. ही एक सन्मानाची आणि आनंदाची बातमी आहे.” ब्रॉडच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि निवृत्तीच्या शुभेच्छा येत आहेत.

दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या ऍशेस कसोटीचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 385 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाखेर त्यांच्या सलामीवीरांना नाबाद 135 धावांची भागीदारी केली. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 249 धावांची गरज आहे. दुसरीकडे इंग्लंड सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसी 10 विकेट्स घ्यावा लागतील. (Stuart Broad shared an emotional post on the last day of his international career)

महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---