इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी अनिर्णित राहिली, कारण पाचवा दिवस पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता वाया गेला. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. ही एकमेव केएल राहुलची विकेट स्टुअर्ट ब्रॉडने घेतली होती. अखेरच्या दिवशी भारताला 157 धावांची गरज होती. पण पावसामुळे अखेरच्या दिवसाचा खेळच झाला नाही.
ब्रॉडसाठी शेवटचे काही कसोटी सामने चांगले राहिले नाहीत. भारताविरुद्ध देखील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही ब्रॉडला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत राहुलची विकेट ब्रॉडसाठी दिलासा देणारी ठरली. या लेखात आम्ही तुम्हाला ब्रॉडशी संबंधित एक भारी आकडेवारी सांगणार आहोत.
आपण सगळे बऱ्याच काळापासून पाहत आलो आहोत की, ब्रॉड डोक्यावर हेडबँड बांधून गोलंदाजी करतो, पण कोरोना काळापूर्वी त्याने हा हेडबँड वापरला नाही. जर तुम्ही ब्रॉडची अलीकडची आकडेवारी पाहिली, तर तुम्हाला दिसून येईल की, हा ‘हेडबँड’ या वेगवान गोलंदाजासाठी खूप भाग्यवान ठरला आहे. पण जेव्हा ब्रॉडच्या डोक्यावर हा हेडबँड नसतो, तेव्हा तो विकेट घेण्यासाठी खूप धडपडताना दिसतो.
महामारीच्या प्रारंभापासून स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 519 धावा देऊन 33 बळी घेतले आहेत. या कालावधीत त्याच्या गोलंदाजीची सरासरी 15.7 आहे. त्याचवेळी, या काळात, जेव्हाही ब्रॉड हेडबँडशिवाय मैदानावर उतरला आहे, तेव्हा त्याचे आकडे खूपच खराब झाले आहेत.
महामारीच्या प्रारंभापासून, जेव्हाही ब्रॉड हेडबँडशिवाय मैदानावर उतरला, तेव्हा ब्रॉडने 244 धावा देऊन केवळ 6 बळी घेतले आहेत. तर त्यांची सरासरी देखील 40.7 होते. एकंदरीत अशा आकडेवारीनुसार ब्रॉडच्या यशात ‘हेडबँड’ लकी ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विनची खरी स्पर्धा जडेजा नव्हे, तर ‘या’ भारतीय खेळाडूबरोबर, माजी भारतीय क्रिकेटरचे मत
दुर्देवच म्हणावं! सलग २ वेळेस फलंदाजाच्या मांड्यांच्या मध्यभागी लागला चेंडू, व्हिडीओ होतोय व्हायरल