---Advertisement---

बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन

On: शनिवार, जुलै 2, 2022 9:17 PM
Stuart-Broad-Resaction
---Advertisement---

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना यवर्षी खेळला जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार बनवले गेले. भेदक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली. बुमराहच्या फलंदाजी पाहून ब्रॉडला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने मोठी धावसंख्या उभी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात शेवटच्या विकेटसाठी खेळपट्टीवर आला. त्याने अवघ्या १६ चेंडूत ३१ धावा चोपल्या. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकार होते. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) बुमराहच्या फटकेबाजीला बळी पडला.

पहिल्या डावातील ८४ व्या षटकात ब्रॉड गोलंदाजीसाठी आला होता. ब्रॉडने या षटकात ४ चौकार आणि २ षटकार मारले. यादरम्यान ब्रॉडने या षटकात ५ वाईड आणि एक नो बॉलही टाकला. बुमराहने जेव्हा लागोपाट दोन चेंडूवर ब्रॉडला चौकार मारेल, तेव्हा त्याची रिएक्शन पाहण्यासारखी होती. गोलंदाजाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की, बुमराहसारखा खेळाडू त्याला एवढ्या धावा चोपत आहे. ब्रॉडने या षटकात ३५ धावा खर्च केल्या, जे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले.

दरम्यान, ब्रॉडच्या चेहऱ्यावरील रिएक्शन पाहिल्यानंतर अनेकांना २००७ सालचा टी-२० विश्वचषक आठवला. या विश्वचषकातील एका निर्णायक सामन्यात युवारज सिंगने ब्रॉडच्या षटकातील ६ चेंडूंवर सलग ६ षटकार मारले होते. या ऐतिहासिक सामन्यात युवराजने ब्रॉडची धुलाई केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीची रिएक्शन होती, अगदी तशीच रिएक्शन बुमराहसमोर गोलंदाजी करताना दिसली. या षटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

उभय संघातील सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ४१६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी इंग्लडे ६.३ षटके फलंदाजी केली आणि पावसामुळे सामना थांबवावा लागला. यादरम्यान इंग्लंडने ३१ धावा करून महत्वाच्या २ विकेट्सही गमावल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

Video: जडेजाने शतक ठोकताच विराटही झाला भलताच खूष, रिऍक्शन पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

बुमराहने इंग्लंडकडून ५५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिवसा दाखवलं चांदणं, लज्जास्पद वर्ल्ड रेकॉर्ड नावावर

Video: ‘कॅप्टन’ बुमराहच्या रुद्रावतारावर विराटही झाला फिदा, डगआऊटमध्ये पोहोचताच केले असे काही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---