---Advertisement---

सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद धोनीने का थांबवला???

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 7:34 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद होता. कोणताही सामना झाल्यावर धोनी स्टंप घेऊन जात असेल.

सामना झाल्यावर चाहत्यांसाठीही  धोनीला स्टंप जमिनीतून उपसून घेऊन जाताना पहाणे सवयीचे झाले होते.

परंतु गेली ४-५ वर्ष धोनीला अशी कृती करताना कुणी पहिले नाही. यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे सध्या क्रिकेट सामन्यात वापरत असलेले स्टंप हे डिजीटल स्टंप असून ते अतिशय महागडे आहेत.

वर्ल्ड कप २०१५मध्ये पाकिस्तान संघावर विजय मिळवल्यानंतर धोनीने स्टंप ऐवजी बेल्स घेतल्या होत्या. परंतु मैत्रीपूर्ण संभाषणात पंच इयान गोऊल्ड यांनी धोनीला असे कारण्यापासून रोखले होते.

याचे मुख्य कारण म्हणजे या एलईडी स्टंपच्या सेटची असलेली किंमत. एका क्रिकेट सामन्यासाठी जवळपास किंमत $४०,००० (२४ लाख रुपये) एवढ्या किंमतीचे स्टंप्स सेट लागतात तर बेल्सच्या जोडीची किंमत अंदाजे ५०,००० रुपये आहे.

यामुळे अधिकारांच्या परवानगी शिवाय धोनी हे स्टंप्स किंवा बेल्स घेऊ शकत नाही. याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे हे स्टंप बनवायला आणि याचा शोध लावायला अंदाजे ३ वर्ष खर्च झाले होते. याचे पेटंट केलेले आहे. आयसीसीने मैदानात वापरण्यात येणाऱ्या अधिकृत वस्तूंबद्दल अतिशय काटेकोर नियमावली बनवली आहे.

ती गोष्ट नक्की खोटी की खरी?
काही माध्यमांनी धोनीने कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर स्टंप्स गोळा करण्याचं सोडलं असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. कसोटीतून धोनी निवृत्त झाल्यावर अगदी पहिल्याच सामन्यात भारत सामना जिंकल्यावरही स्टंप उपसून घेऊन जाताना दिसला नव्हता. याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मात्र उपलब्ध नाही.

म्हणून धोनी करायचा स्टंप गोळा..
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत एकदा धोनीने सांगितले होते की निवृत्त झाल्यावर हे स्टंप कोणत्या सामन्यातील आहे हे ओळखण्याचा तो खेळ खेळणार आहे. कारण स्टंप गोळा करणे ही चांगली गोष्ट असली तरी तो त्यावर ते कोणत्या सामन्यातील आहे याची कोणतीही खूण करत नाही. म्हणून तो स्टंपवरील लोगो आणि सामन्यांचे विडिओ पाहून ते नक्की कुठले आहेत हे पाहणार आहे. त्याच्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हा एक चांगला विरंगुळा होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment