टाँटॉन। 2019 विश्वचषकात काल(12 जून) 17 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 41 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा या विश्वचषकातील तिसरा विजय आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 308 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 27 चेंडूत 42 धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला अफलातून धावबाद केले. त्यामुळे पाकिस्तानने शेवटची विकेटही गमावली आणि सामनाही गमावला.
झाले असे पाकिस्तानची शेवटची विकेट बाकी असताना शाहिन आफ्रिदी सर्फराजबरोबर फलंदाजी करत होता. यावेळी केन रिचर्डसनने टाकलेल्या एका चेंडूवर शाहिनने कव्हरच्या दिशेने फटका मारला.
त्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरुन जाईल असा विचार करुन सर्फराज एक धाव घेण्यासाठी धावला. पण मॅक्सवेलने त्याच्या डाव्या बाजूला उडी मारत एका हाताने तो चेंडू झेलला आणि थेट नॉनस्ट्रायकर एन्डच्या स्टंम्पवर थेड फेकला. त्यामुळे पाकिस्तानने सर्फराजच्या रुपात शेवटची विकेट गमावली.
— Sports Freak (@SPOVDO) June 12, 2019
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना वॉर्नरने 111 चेंडूत 107 धावांची शतकी खेळी केली. तसेच त्याने पहिल्या विकेटसाठी 82 धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार ऍरॉन फिंचसह 146 धावांची भागीदारीही रचली.
या दोघांच्या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 307 धावा केल्या . तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने शानदार गोलंदाजी करताना 10 षटकात 30 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानकडून इमाम उल हकने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मोहम्मद हाफिज(46), कर्णधार सर्फराज अहमद(40) आणि वहाब रियाजने(45) धावा करताना थोडाफार संघर्ष केला.
परंतू अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने पाकिस्तानचा डाव 45.4 षटकात 266 धावांवर संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 10 षटकात गोलंदाजी करताना 33 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: या दोन संघात होणार अंतिम सामना, गुगल सीईओ सुंदर पिचाईनी व्यक्त केला अंदाज
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल विश्वचषकानंतर होणारा टीम इंडियाचा विंडीज दौरा
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड विरुद्ध अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया