रायपूर येथे ५ ते २१ मार्च दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज खेळवण्यात आली होती. पण आता ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. कारण या स्पर्धेत इंडिया लिजेंड्सकडून खेळलेला तिसरा खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या स्पर्धेत खेळलेले सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांचा कोरोना अहवाल शनिवारी (२७ मार्च) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता रविवारी (२८ मार्च) एस बद्रिनाथ याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बद्रिनाथने ट्विट करत माहिती दिली आहे की ‘आवश्यक त्या सर्व खबरदारी मी घेतल्या आहेत आणि नियमितपणे तपासणी करत आहे. तरी मी कोविड-१९ पॉझिटिव्ह अढळलो आहे. मला काही सौम्य लक्षणे होती. मी सर्व नियम पाळेल आणि मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. तसेच मी माझ्या डॉक्टरांनी सांगतलेल्या सर्व खबरदारी घेत आहे.’
https://twitter.com/s_badrinath/status/1376121706071302152
अंतिम सामन्यात खेळला होता बद्रिनाथ
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज २०२१ च्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सकडून श्रीलंका लिजेंड्सविरुद्ध बद्रिनाथ खेळला होता. त्याने या सामन्यात ७ धावा केल्या होत्या. हा सामना इंडिया लिजेंड्सने १४ धावांनी जिंकला होता.
बद्रिनाथची कारकिर्द –
बद्रिनाथने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ६३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने खेळलेल्या ७ वनडे सामन्यात ७९ धावा केल्या असून त्याने भारताकडून १ टी२० सामना देखील खेळला आहे. यात त्याने ४३ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये ९५ सामने खेळले असून १४४१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ये जोडी हैं नंबर वन! रोहित-धवनच्या जोडीने केलाय वनडेत खास विक्रम
असं कोण मारतं भावा! गुडघ्यावर बसत रिषभचा ‘३६० डिग्री षटकार’, पाहून विस्फारतील तुमचेही डोळे





