भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यात रविवारी (17 सप्टेंबर) आमने सामने असतील. रोहित शर्म भारताचे, तर दासून शनाका श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात नाणेफेक श्रीलंकने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आशिया चषक जिंकण्यासाठी दोन्ही संघ कडवे आव्हान देणार आहेत. पण कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचे पारडे काही अंशी जड दिसते.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागच्या मोठ्या काळापासून संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मागच्या दोन वर्षांपासून रोहित भारतीय संघाचा नियमित कर्णधार देखील राहिला आहे. त्याच्या नेतृत्वातील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. आयपीएलमध्ये 2013 साली रोहितने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला पहिली ट्रॉफी जिंकवून दिली. त्यानंतर पाच आयपीएल ट्रॉफी मुंबईने रोहितच्याच नेतृत्वात जिंकला. 2018 साली भारताने जिंकलेला आशिया चषक रोहित शर्माच्याच नेतृत्वात जिंकला होता. सोबतच 2017 मध्ये श्रीलंकेत झालेली निदाहास ट्रॉफीही रोहितने भारताला मिळवून दिली होती.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचे अंतिम सामन्यांमध्ये प्रदर्शन
2013 आयपीएल – विजय
2013 चॅम्पियन्स लीग टी20 – विजय
2015 इंडियन प्रीमियर लीग- विजय
2017 आयपीएल – विजय
2018 आशिया चषक – विजय
2018 निदाहास ट्रॉफी – विजय
2019 आयपीएल – विजय
2020 आयपीएल – विजय
2023 जागतिक कसोटी अजिंक्यपद – पराभव
2023 आशिया चषख – ?
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.
(Successful captain Rohit will win the Asia Cup for India? Failed only once)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक
Final: ‘हिटमॅन’ घडवणार इतिहास! फक्त पाऊसच रोखू शकतो रोहितचा ‘हा’ Record, श्रीलंकेच्याही हातात नाही काही