---Advertisement---

धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 3:39 PM
sudhir kumar gautam
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला क्रिकेटचा देव (God Of Cricket) म्हणून ओळखले जाते. त्याचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. मात्र, सचिन सर्वात मोठा चाहता म्हणून सुधीर कुमार गौतम (Sudhir Kumar Gautam) याला ओळखले जाते. सचिन क्रिकेट खेळत असताना ही तसेच आता भारतीय संघ भारतात कोठेही खेळत असताना तो नेहमीच संघाचे प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजर असतो. आता याच सुधीरबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिहार पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे वृत्त काही माध्यमांतून दिले गेले आहे. (Sudhir Kumar Gautam Beaten By Bihar Police)

काय आहे हे प्रकरण
गुरुवारी (२१ जानेवारी) बिहारमधील मुझफ्फरपूर येथील टाऊन ठाणे पोलिसांनी सुधीर कुमारचा चुलत भाऊ किशन कुमार याला ताब्यात घेतले होते. सायंकाळी सुधीर आपल्या राहत्या घरी पोहोचला तेव्हा त्याला संपूर्ण प्रकार समजला. किशन कुमारला पोलिस घेऊन गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले, मात्र प्रकरण काय आहे, हे सांगितले नाही. यानंतर सुधीरने स्वत: पोलीस ठाणे गाठला. तेथे पोलिसांनी त्याच्या चुलत भावाला तुरूंगामध्ये ठेवले होते.

आपला भाऊ तुरूंगामध्ये बंद असल्याचे पाहून सुधीर थेट त्याच्याकडे गेला आणि त्याच्याशी बोलू लागला. त्यावर त्याने आपल्या एका मित्राने जमीन खरेदी केल्याचे आणि यावेळी त्यांचे नाव साक्षीदार म्हणून देण्यात आले होते व याच जमिनीच्या वादातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे त्याने सांगितले. सुधीर आपल्या भावाशी बोलत असताना पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला सुधीरकुमार यांनी विरोध केला असता त्या कर्मचाऱ्याने सुधीर याला मारहाण केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली तक्रार
मारहाणीनंतर सुधीर पोलिस ठाण्यातून बाहेर आला. त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार डीएसपीकडे केली, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीई तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सुधीर कुमार म्हणला की, ज्या पोलिस स्टेशनचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले होते, त्याच स्टेशनमध्ये मारहाण होणे दुर्दैवी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या अंडर-१९ संघातील ५ खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ‘या’ पठ्ठ्यांची लॉटरी, जाणार वेस्ट इंडिजला (mahasports.in)

धोनीचा रोल मिळावा म्हणून सुशांत सिंग रजपूतने घेतली होती केवळ एवढी रक्कम (mahasports.in)

मोठी बातमी! भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात, सोशलवर दिली माहिती (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---