पुणे: जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला सुकांत कदमने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट तो बाळगून आहे. स्पर्धेला उद्या (1 ऑक्टोबर) जपानमध्ये टोकियो येथे सुरुवात होत आहे. पुण्याच्या सुकांतने यापूर्वी २०१९ मध्ये बासेल येथे झालेल्या अखेरच्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.
सुवर्णपदक हेच अंतिम ध्येय असले, तरी त्यासाठी एकावेळी एका फेरीवर लक्ष केंद्रित करून अंतिम फेरी गाठण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सुकांतने सांगितले. सुकांत कदम (Sukant Kadam) यापूर्वी गेल्या स्पर्धेत कांस्यपदक विजेता आहे. त्याने २०१७ मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. या वेळी हसन मुबिरू (युगांडा) आणि व्हिएवान थुओंग न्गुयेन (व्हिएतनाम) यांच्यासह सुकांतचा ब गटात समावेश आहे.
“माझी तयारी चांगली झाली आहे. कठोर मेहनत घेऊन मी जागतिक स्पर्धेसाठी सज्ज झालो आहे. संयम बाळगणे आणि गेम कौशल्यात सुधारणा करणे यावर सराव सत्रात भर दिला आहे. येणारे प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज आहे, असेही सुकांतने सांगितले.
टोकियोतील आठवणी सुकांतसाठी कडू आहेत. तो यापूर्वी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. २०१९ पॅरालिम्पिक स्पर्धेत तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचला होता.
2020 हे वर्ष होते जेव्हा तो ऑलिम्पिकच्या सर्वात मोठ्या टप्प्यावर खेळू शकला नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आणि तरुण तरुण आणि सुहास एल यतीराज यांच्यानंतर तिसरा क्रमांक मिळवून तो पात्रतेमध्ये कमी होता. “होय असे आहे की तुम्ही काही जिंकले आणि काही हरले आणि मला वाटते की त्या क्षणाने मला 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकसाठी चांगली तयारी करण्यास मदत केली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मी ऑलिम्पिकचे स्वप्न बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्याचा विचार करीत आहे”.
सुकांतसमोर या वेळी स्पर्धेत खऱ्या अर्थाने अव्वल मानांकित लुकास मजूर (फ्रान्स) याचे आव्हाने असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेसाठी दोन संघांची निवड, दोन महत्त्वाच्या खेळाडूंना डच्चू






