---Advertisement---

पुनरागमनासाठी सुकांत सज्ज! पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हेच मुख्य उद्दिष्ट

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 8:03 PM
Sukant Kadam
---Advertisement---

पुणे। पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारा पुण्याचा सुकांत कदम पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेपासून तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवणार असून, त्याला स्पर्धेसाठी दुसरे मानांकन देण्यात आले आहे. 

सुकांतने व्यावसायिक कारणामुळे तीन महिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता तो प्रथमच स्पर्धेत उतरणार आहे. थायलंडमध्ये पट्टाया येथे ही स्पर्धा होणार आहे. ब्राझील येथे एप्रिल महिन्यात तो अखेरची स्पर्धा खेळला होता. त्या स्पर्धेत एकेरीत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.

पुन्हा स्पर्धात्मक पातळीवर उतरताना सुकांत म्हणाला, “माझा आत्मविश्वास कुठेही कमी झालेला नाही. विजयी पुनरागमनासाठी मी उत्सुक आहे. काही महत्वाच्या कामासाठी मला मायदेशी परतावे लागले होते. मात्र, आता मी पूर्ण सज्ज आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यादृष्टिनेच मी प्रयत्न करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukant Kadam (@sukant9993)

पॅरा बॅडमिंटन स्पर्धेच्या एसएल – 4 विभागातील गमावलेले अव्वल स्थानही मला परत मिळवायचे आहे. डोळ्यासमोर बरीच उद्दिष्टे आहेत. पण, एका वेळी एकाच स्पर्धेकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही तो म्हणाला.

थायलंड येथील स्पर्धेत त्याच्यासमोर फ्रान्सचा अव्वल मानांकित लुकास मझुर याचे मुख्य आव्हान असेल. सुकांत चौथ्यांदा थायलंड येथे खेळ आहे. यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये ब्रॉंझपदक मिळविले होते. 2018 मध्ये तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचला होता. स्पर्धेत सुकांत एकेरीखेरीज पुरुषांच्या दुहेरीतही सहभागी होणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत त्याचा दुहेरीतील साथीदार असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

झिम्बाब्वेमध्ये इशान किशनला भेटला भारतीय फॅन! म्हणाला, ‘मी पटनाचा…’

अनुभवी संघांना पछाडत नवख्या जर्सीने मारली बाजी! वर्ल्डकप क्वालिफायर्सचे तिकीट केले बुक

विंडीजच्या ‘या’ खेळाडूने संघासाठी एक नव्हे तर दोन विश्वचषक जिंकण्याची इच्छा केली व्यक्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---