---Advertisement---

सुलतान अझलन शहा कप हॉकी: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

On: मंगळवार, मार्च 6, 2018 7:52 PM
---Advertisement---

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ४-२ ने पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताच्या अंतिम सामन्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

भारतीय संघ तिसऱ्या सत्रापर्यंत ४-० ने पिछाडीवर होता. मात्र चौथ्या आणि शेवटच्या सत्रात भारताच्या रमनदीप सिंगने दोन गोल करत भारताचा व्हाईटवॉश टाळला आहे.

भारताने सामन्याच्या पहिल्या सत्रात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चांगली लढत देऊन एकही गोल करण्याची संधी दिली नव्हती.

मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्क नोल्स, अरन झलवेस्की, डॅनियल बेअले आणि ब्लॅक गोव्हर्स यांनी गोल करत ऑस्ट्रेलियाला ४-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली होती.

भारताला आता अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी आयर्लंड आणि मलेशिया विरुद्ध विजय आवश्यक आहे. तसेच त्यांना अर्जेंटिनाच्या पुढील सामन्यातील पराभवाची अशा करावी लागेल.

भारताने या आधी या स्पर्धेत पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध ३-२ असा पराभव स्वीकारला आहे आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment