सुमित अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या F64 प्रकारात 70.59 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला. याआधीही पॅरालिम्पिकचा विक्रम सुमितच्या नावावर होता. ज्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटर भालाफेक करून विक्रम केला होता.
सुमितने पहिल्याच प्रयत्नात 69.11 मीटर अंतर कापून नवा विक्रम केला होता. पण जेव्हा सुमितने दुसऱ्यांदा भाला फेकला तेव्हा तो 70.59 मीटर अंतरावर पडला. सुमितने एकाच सामन्यात दोनदा पॅरालिम्पिक विक्रम मोडण्याचा पराक्रम केला आहे.
Sumit Antil’s phenomenal performance in the Javelin Throw F64 event brings home the Gold! 🥇
India’s medal tally climbs to 1⃣4⃣ at the Paris Paralympics. What a remarkable achievement! #Cheer4Bharat pic.twitter.com/eggF4f3qXf
— Smriti Z Irani (@smritiirani) September 3, 2024
सुमित अंतिलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले. या सामन्यात त्याने टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम तीनदा मागे टाकला कारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नाव्यतिरिक्त त्याने पाचव्या प्रयत्नात 69 मीटरचा टप्पाही पार केला. श्रीलंकेच्या दुलनने 67.03 च्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने 64.89 मीटरच्या प्रयत्नाने कांस्यपदक जिंकले.
सुमित अंतिल भारताचा दुसरा गोल्डन बाॅय
सुवर्णपदक टोकियो पॅरालिम्पिकमध्ये
सुवर्णपदक पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये
सुवर्णपदक पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये
सुवर्णपदक कोबे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये
सुवर्णपदक आशियाई खेळांमध्ये
सुमित अंतिल भालाफेकच्या F64 श्रेणीचा बादशाह बनला आहे. केवळ पॅरालिम्पिकच नाही तर या स्पर्धेचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने 73.29 मीटर भालाफेक करून नवा विश्वविक्रम केला होता. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव करणारा अवनी लेखरा नंतर तो आता फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हे दोन्ही खेळाडू टोकियो आणि आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
– 🥇 for Nitesh Kumar.
– 🥈 for Thulasimathi.
– 🥈 Yogesh Kathuniya.
– 🥈 for Suhas Yathiraj.
– 🥉 for Manisha.
– 🥉 for Sheetal & Rakesh.
INDIA WON 7 MEDALS TODAY IN PARIS PARALYMPICS – WHAT A DAY FOR INDIA. 🇮🇳🙌 pic.twitter.com/jb3rhVdxtI
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 2, 2024
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून शानदार कामगिरी पाहायला मिळत आहे. भारतीय ऍथलेटिक्स एकापाठोपाठ पदके जिंकून टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम तोडण्याच्या दिशेन धाव घेत आहेत. आता 5 दिवसपूर्ण झाल्यानंतर भारताच्या खात्यात 15 पदके आले आहेत. ज्यामध्ये केवळ 5 व्या दिवशी म्हणजे काल (02 ऑगस्ट) भारताला 8 पदके मिळाली.
हेही वाचा-
‘संपूर्ण जग थुंकेल…’, युवराज सिंगच्या वडिलांचा कपिल देववर खळबळजनक वक्तव्य
Paralympics 2024: सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 7 पदके; या खेळातून आशा
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे टाॅप-5 फलंदाज