टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये टेनिस क्रीडा प्रकारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑलिंपिकमध्ये मागील २५ वर्षांमध्ये पुरुषांच्या टेनिस एकेरी स्पर्धेत विजय मिळवणारा तो तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. त्याने शनिवारी (२४ जुलै) झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला ३ सेटमध्ये पराभूत केले.
नागलने २ तास ३४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात इस्तोमिनला ६-४, ६-७, ६-४ ने मात दिली.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Tennis
Men's Singles First Round Results@nagalsumit overcomes a rollercoaster encounter against Istomin. Becomes only 2nd Indian to reach the second Round at the #Olympics What a debut performance! Medvedev up next! #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/L7LTzuNTqD— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
यापूर्वी झीशान अलीने सियोल ऑलिंपिक १९८८ च्या टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत पराग्वेच्या व्हिक्टो काबालेरोला पराभूत केले होते. त्यानंतर लिएंडर पेसने ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीला धूळ चारत अटलांटा ऑलिंपिक १९९६ मध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.
पेसनंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या टेनिस एकेरी स्पर्धेत कोणालाही विजय मिळवता आला नव्हता. सोमदेव देववर्मन आणि विष्णू वर्धन लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये पहिल्या राऊंडमध्येच पराभूत झाले होते.
सुमित नागल ऑलिंपिकपूर्वी आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता. त्याला पहिल्या सेटच्या सहाव्या गेममध्ये इस्तोमिनची सर्व्हिस तोडण्याची संधी मिळाली, जी त्याने गमावली. इस्तोमिनची सर्व्हिस तोडून त्याने पहिला सेट जिंकला. (Indian Tennis Player Sumit Nagal Becomes Only Third Indian To Win A Singles Match At Olympic)
दुसऱ्या सेटमध्येही तो ४-१ ने पुढे होता. मात्र, तो दबावात आल्याने आपल्या सर्व्हिस वाचवू शकला नाही. इस्तोमिनने त्याला चांगलेच आव्हान दिले होते.
शेवटच्या सेटमध्ये सुमितने आपली लय काम ठेवली. मात्र, आता त्याचा सामना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेता मेदवेदेवशी होणार आहे. त्याने कझाखस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिकला ६-४ आणि ७-६ ने पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताच्या अपेक्षांवर पाणी! चीनविरुद्ध टेबल टेनिसच्या मिश्र गटात शरत अन् मनिका पराभूत
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक
-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट