नेपीयर। भारताने आज (23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. यावेळी शिखर धवनने नाबाद 75 आणि विराट कोहलीने 45 धावांची महत्त्वाची खेळी केली आहे.
आजचा सामना प्रखर सुर्यप्रकाशामुळे 25 मिनिटे थांबवला गेला होता. पावसामुळे किंवा कमी सुर्यप्रकाशामुळे काही सामन्यात आधीही व्यत्यय आला आहे. मात्र प्रखर सुर्यप्रकाशामुळे सामना थांबवला जाणे हे क्वचितच घडते. याआधी रावळपिंडी येथेही प्रखर सुर्यप्रकाशामुळे कसोटी सामने 10-15 मिनिटे थांबवले गेले होते.
त्याचबरोबर चार वर्षापूर्वी नेपीयरमध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वन-डे सामन्यातही प्रखर सुर्यप्रकाशामुळे अडचणी आल्या होत्या. तेव्हा न्यूझीलंडचा कर्णधार असणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने पाकिस्तानच्या अहमद शहजादला त्याचा गॉगल देऊ केला होता. मात्र शहजादने तो गॉगल नाकारला होता.
यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 369 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानला 250 धावाच करता आल्याने या सामन्यात त्यांना 119 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
So sun stopped play in Napier today. Reminds me of cricket in Rawalpindi, where there used to be a 10-15 mins break, even in Tests, due to dazzling sunlight.
Ahmed Shehzad also had issue with sunlight in Napier four years ago. B McCullum offered him sunglasses but he refused.
— Mazher Arshad (@MazherArshad) January 23, 2019
आजच्या सामन्यात न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या होत्या.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! असेही एक कारण ज्यामुळे टीम इंडियाचा हा विजय आहे खास
–वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंमध्ये आहे तब्बल ४ भारतीयांचा समावेश
–केवळ १३ धावा करणाऱ्या रायडूने कोहली-धोनीचे टेन्शन वाढवले