मुंबई । कोरोनामुळे लागू झालेल्या नवीन नियमांमुळे या वेळी आयपीएल थोडा वेगळा असेल. युएईच्या ‘स्लो’ खेळपट्टीवर खेळणे फलंदाजांना एक वेगळे आव्हान ठरणार आहे. फिरकी गोलंदाजी चांगली खेळणारे फलंदाज वर्चस्व गाजवताना दिसू शकतात. अशा परिस्थितीत माजी भारतीय कर्णधार गौतम गंभीरने या हंगामात सुनील नरेन हा खेळाडू ट्रम्प कार्ड ठरेल, असे भाकीत केले आहे.
सुनील नरेनचा आयपीएलमधील माजी कर्णधार गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की, युएईच्या खेळपट्टीवर ग्रिप मिळाल्यास कोलकाता नाईट रायडर्सचे फिरकीपटू खूप उपयुक्त ठरतील. स्टार स्पोर्ट्स ‘क्रिकेट कनेक्ट’ कार्यक्रमात गंभीर म्हणाला, “युएईच्या विकेट्सकडून थोडी ग्रिप मिळवली तर सुनील नरेन खूप प्रभावी ठरेल.”
आपल्या नेतृत्वाखाली केकेआरला दोन वेळा चॅम्पियन बनविणारा गंभीर म्हणाला, “सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुनील नरेन रनअपच्या वेळी बॉल लपवतो तेव्हा फलंदाजांच्या अडचणी वाढतात. कोणता चेंडू येईल आणि कोणता बाहेर पडेल हे माहित नाही. कारण जेव्हा हातातला चेंडू उशीरा दिसू लागतो तेव्हा फलंदाजांना त्याचा अंदाज बांधणे कठीण होते.”
सुनील नरेनने 110 सामन्यांत 6.67च्या सरासरीने 122 विकेट्स घेतले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याने अनेक वेळा सलामीला फलंदाजीही केली. यात तीन अर्धशतके ठोकणारा भारतीय वंशाच्या या कॅरेबियन फिरकी गोलंदाजाने 771 धावा केल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारत ऐवजी यंदा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होईल. भारतात आठ ते दहा वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळले जातात, तर युएईमधील दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन मैदानावर सामने होणार आहेत.