---Advertisement---

ट्राॅफी जिंकल्यानंतर सुनील नारायणनं चक्क गौतम गंभीरला घेतलं उचलून! सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा  विजेतेपद पटकावलं. रविवारी (26 मे) रोजी झालेल्या फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी एकतर्फी पराभव केला. केकेआरच्या विजयाचं श्रेय संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरला जाते. गौतम गंभीर केकेआरच्या संघात मेन्टाॅर म्हणून समाविष्ट झाल्याने कोलकाताचा 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला.

यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं दोन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होत. कर्णधार म्हणून गौतम गंभीरनं केकेआरला 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. आता एक मार्गदर्शक म्हणून गंभीरने केकेआरला विजेतेवद पटकावून दिले. गेल्या दोन हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा भाग असलेला गौतम गंभीर, आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी केकेआरमध्ये मेन्टाॅरच्या भूमिकेत सामील झाला. केकेआरमध्ये गौतम गंभीरचे पुनरागमन संघासाठी खूप मोलाचं ठरलं. आणि कोलकातानं 10 वर्षांनंतर आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.

या हंगामात गौतम गंभीरनं सुनील नारायणला फलंदाजीत खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्याला फलंदाजी करण्यासाठी सलामीला पाठवले. ज्याचा संघाला फायदा झाला. नारायण आणि फिल सॉल्टच्या जोडीनं अनेक सामन्यात संघाला स्फोटक सुरुवात करून दिली होती. फायनल सामन्यात केकेआरनं फिल साॅल्टच्या जागी रहमानुल्लाह गुरबाजला संघात सामील केलं होत. केकेआर चॅम्पियन बनल्यानंतर सुनील नारायणने गंभीरला आपल्या कुशीत घेऊन उचलले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक २४ धावा केल्या. आंद्रे रसेलनं 3, मिचेल स्टार्क आणि हर्षित राणाने प्रत्येकी 2 गडी बाद केले. कोलकाता संघाने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकात मात्र 2 गडी गमावून पूर्ण केलं. व्यंकटेश अय्यरनं 26 चेंडूत 52 धावांची आक्रमक खेळी खेळली. तर सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने 39 धावा करत संघाला मोलाचं योगदान दिलं.

महत्वाच्या बातम्या-

पॅट कमिन्सनं सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “आम्ही चौकार-षटकार मारून…”

केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खान सैराट! गंभीरचा मुका घेतला, स्टार्कवर प्रेमाचा वर्षाव; पाहा VIDEO

नितीश रेड्डी उदयोन्मुख खेळाडू तर मॅकगर्क सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर; जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---