---Advertisement---

लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी

Sunil Chhetri
---Advertisement---

कोलकाताच्या सॉल्टलेक स्टेडियमवर रविवारी (18 सप्टेंबर) झालेल्या ड्युरंड कपच्या अंतिम सामन्यात बेंगलुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या शिरपेचात या विजेतेपदामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतातील सर्व प्रमुख फुटबॉल स्पर्धा जिंकणारा बेंगलुरू एफसी पहिला क्लब ठरला आहे. मात्र या सामन्यातील एक व्हिडिओ चागंलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीचा आहे.

सामन्यानंतर बेंगलुरू एफसीचा (Bengaluru FC) कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याला ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर बोलावले. त्यानंतर फोटो सेशन झाले. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

यामध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल एल गणेशन फोटो काढण्यासाठी पुढे आले. यावेळी त्यांनी छेत्रीला बाजूला केल्याचे दिसत आहे. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चाहत्यांनी ट्वीट करत आपला राग व्यक्त केला आहे. यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी देखील ट्वीट करत आपली नाराजी दर्शवली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘हे अंत्यत वाईट आहे.’

काही चाहत्यांनी लिहिले, ‘तो एक खेळाडू आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे.’ काहींनी लिहिले की, ‘त्यांनी सुनील छेत्री आणि भारतीय फुटबॉलची माफी मागितली पाहिजे.’

छेत्रीने भारतीय फुटबॉलसाठी जे केले त्यामुळे आजही भारताच्या या संघाचे लोक चाहते आहेत. सध्या तो राष्ट्रीय संघातील सर्वात अनुभवी, महत्वाचा खेळाडू आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये तो क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी यांच्या यादीत गणला जातो. यामुळे भारतीय लोकांचे त्याच्यावर विशेष प्रेम आहे. त्याच्यासोबत झालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे चाहत्यांचा राग साहजिकच आहे.

अंतिम सामन्यात बेंगलुरूच्या शिवशक्ती नारायण याने 11 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या अपुया याने 30 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत सामना याच स्थितीत राहिला. दुसऱ्या सत्रामध्ये ऍलन कोस्टा याने 61 व्या मिनिटाला झळकावलेला गोल सामन्यातील अखेरचा गोल ठरला. त्यानंतर कोणीही गोल करू न शकल्याने बेंगलुरू एफसीने विजेतेपद आपल्या नावे केले. ड्यूरंड कप स्पर्धेचे हे 131 वे वर्ष होते. ही जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहरा आयपीएलदरम्यान कागदावर काय करायचा? गुजरातच्या प्रशिक्षकाने स्वतः दिले उत्तर
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरणार पॅट कमिन्स! म्हणतोय, ‘विश्रांतीनंतर आता…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---