भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा(एआयएफएफ) २०१७वर्षाचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
छेत्री हा नुकताच १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बायचुंग भुतिया नंतरचा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच तो राष्ट्रीय संघाकडून आणि बेंगलुरू फुटबॉल क्लबकडून खेळणारा उत्तम स्ट्रायकर आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जून महिन्यात झालेला इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला आहे. या स्पर्धेत त्याने ४ सामन्यात ८ गोल केले. छेत्रीने दिलेल्या योगदानाबद्दल एआयएफएफने त्याला पाचव्यांदा हा पुरस्कार दिला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्री ६४ गोलसह पोर्तुगलच्या क्रिस्तियानो रोनाल्डो(८५) आणि अर्जेटिनाच्या लियोनल मेस्सी(६५) नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच एआयएफएफ २०१७चे बाकीचे पुरस्कार खालिलप्रमाणे,
तळागाळातील स्तरांमध्ये फुटबॉल विकासाचे काम- केरळ फुटबॉल अकादमी
फुटबॉलमध्ये अनेक वर्ष सातत्याने योगदान- हिरो मोटोकॉर्प
उत्कृष्ठ सहाय्यक पंच- सुमंता दत्त(आसाम)
उत्कृष्ठ पंच- सी आर श्रीकृष्णा
उद्योन्मुख महिला फुटबॉलपटू- इ पॅंथोई
उद्योन्मुख पुरूष फुटबॉलपटू- अनिरुद्ध थापा
सर्वोत्कृष्ठ महिला फुटबॉलपटू- कमला देवी
महत्त्वाच्या बातम्या-
–माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेतली निवृत्ती
–स्म्रीती मानधनाचे किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन