भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली बांगलादेशविरूद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत भारताने अनेक रेकाॅर्ड त्याच्या नावावर केले. परंतु भारताचे माजी दिग्गज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या या यशाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
स्पोर्ट्सस्टारसाठी कॉलममध्ये सुनिल गावसकरांनी (Sunil Gavaskar) लिहिले की, “भारतीय संघ सध्या ज्या नवीन दृष्टिकोनाने मैदानात उतरतो आहे ती कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) देणगी आहे. आक्रमक फलंदाजीचे श्रेय गौतम गंभीरला (Gautam Gambhir) देणे अयोग्य आहे, तो बऱ्याच काळापासून कोचिंग करत नाही आणि त्याने स्वतः कधीही त्या शैलीत फलंदाजी केली नाही.”
पुढे गावसकरांनी लिहले की, “गंभीरला प्रशिक्षकपद मिळून काही महिने झाले आहेत, त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या फलंदाजीचे श्रेय देणे म्हणजे तुम्ही त्याचे पाय चाटत आहात. श्रेय फक्त रोहितलाच द्यायला हवे इतर कोणालाही नाही. कानपूर कसोटीत निकाल लागणार नाही असे वाटत होते, पण रोहितने पुन्हा मार्ग दाखवला, त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले आणि इथून भारतीय डावाला गती मिळाली. भारतीय संघाच्या पहिल्या डावाने सामना सेट केला आणि विजयानंतर संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठी मदत मिळाली.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली, स्मिथ, विल्यमसन तर दूरच… जगातील कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, रोहितचे ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’
महान क्रिकेटर होण्यापासून वंचित राहिला ‘हा’ खेळाडू, तरूण वयातच संपली कारकिर्द
भारतीय महिला करणार पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न, इस्लाम धर्माचाही करणार स्वीकार