मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रिषभ पंत ज्या प्रकारे बाद झाला, ते पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर त्याच्यावर खूप चिडले आहेत. त्यांनी कॉमेंट्रीदरम्यान पंतवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी पंतच्या शॉटला ‘मूर्खपणा’ म्हटलं आहे. कसोटीच्या पहिल्या डावात पंत वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडविरुद्ध स्कूप शॉट मारण्याच्या प्रयत्नात शॉर्ट फाइन लेगवर झेलबाद झाला.
पंतच्या या बेजबाबदार शॉटवर गावस्कर यांनी टीका केली आहे. “मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा,” असं ते एबीसी रेडिओवर बोलताना म्हणाले. सुनील गावस्कर म्हणाले, “तेथे दोन क्षेत्ररक्षक आहेत. तरीही तुम्ही तिथेच शॉट मारणार आहात का? तुमचा शेवटचा शॉट चुकला होता. आता पाहा तुम्ही कुठे आऊट झाला. हे एकप्रकारे विकेट फेकणंच आहे.”
सुनील गावस्कर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पंतवर आणखी बोचऱ्या शब्दांत टीका केली. “हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही. मला माफ करा, परंतु हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही. हा मूर्खपणाचा शॉट आहे, ज्यामुळे संघ अडचणीत येतो. तुम्ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. त्यानं (रिषभनं) ड्रेसिंग रूममध्ये (भारताच्या) येऊ नये. दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जावं”, असं गावस्कर म्हणाले.
यावेळी गावस्कर यांच्यासोबत जेष्ठ समालोचक हर्षा भोगले कॉमेंट्री करत होते. गावस्कर यांना आलेला राग पाहून ते देखील हैराण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Sunil Gavaskar on Rishabh Pant – “Stupid, stupid, stupid!” 😯 #INDvsAUS pic.twitter.com/QvYtqzQfW0
— Richard Kettleborough (@RichKettle07) December 28, 2024
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात चाहत्यांना पंतकडून खूप अपेक्षा होत्या. येथे त्याला चांगली सुरुवातही मिळाली होती. परंतु स्कॉट बोलँडविरुद्ध काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नात तो झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्यानं आपल्या संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण 37 चेंडूंचा सामना केला. या दरम्यान त्यानं 75.68 च्या स्ट्राइक रेटनं 28 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून तीन चौकार आले.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय, दिग्गजांच्या लिस्टमध्ये नितीश रेड्डीचाही समावेश
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या आशा जिवंत, जाणून घ्या समीकरण
नितीश आणि वॉशिंग्टनने रचला विक्रम, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं