जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंड संघ सामन्यावर पकड बनवताना दिसून आला. तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रात भारतीय संघाने ७ गडी गमावले व २१७ धावांवर सर्वबाद झाले. दरम्यान भारतीय संघाच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. परंतु ४९ धावांवर खेळत असताना तो एक खराब फटका खेळून झेलबाद झाला. यामुळे माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर हे खूप निराश झाले आहेत.
या सामन्यात विराट आणि रहाणे या दुसर्या दिवसाखेर नाबाद होतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी या जोडीकडून संघाला आणि चाहत्यांना मोठ्या आशा होत्या. कोहलीने एकही धाव न करता आपली विकेट गमावली. पण त्यानंतर रहाणे चांगली फलंदाजी करत होता. रहाणे भारताचा धावफलकहालता ठेवत होता. परंतु त्यानंतर नील वॅगनरने नियोजनानुसार गोलंदाजी केली आणि रहाणेने स्लीपकडे खराब फटका मारला. यावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिलेल्या टॉम लेथमने झेल पकडला आणि रहाणे झेलबाद झाला.
अर्धशतकाच्या नादात गमावली विकेट
अजिंक्य रहाणेच्या त्या फटक्यामुळे माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांना खूप राग आला आहे. समालोचन करताना व्हिव्हिएस लक्ष्मणसोबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्नामध्ये रहाणेने आपली विकेट गमावली. या खराब फटकाराचे एकमेव स्पष्टीकरण हे असू शकते की रहाणेला आपले अर्धशतक पूर्ण करायचे होते. हा विक्रम साध्य करण्यासाठी तो लेग साइडमध्ये हलका फटकार खेळत केवळ एक धाव घेण्याच्या विचारात होता. शेवटी चेंडू खूपच उसळला आणि तो शॉटवर नियंत्रण ठेवू शकला नाही. यामुळे पहिल्याच चेंडूवरही त्याला चांगला फटकार खेळता आला नाही. म्हणूनच त्याने आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली.”
गोलंदाजांनी रहाणेला नियोजन करून बाद केले
व्हिव्हिएस लक्ष्मण रहाणेच्या बाद होण्यावर बोलले की, “न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये रहाणेला बाद करण्याची अशीच योजना आखण्यात आली होती. त्याला या समस्येवर मात करावी लागेल. नील वेगनरने त्याला अर्ध्या मनाने पुल फटकार खेळायला भाग पाडले. त्यामुळे रहाणे निश्चितच निराश होत असेल.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला आलो. तेव्हा सचिनने मला सांगितले की तुमचा ऑफ स्टंप कोठे आहे? हे तुम्हाला माहित असले पाहिजे. बाउन्सर चेंडू कसा सोडावा? हेदेखील आपल्याला माहित असले पाहिजे. जर विरोधी संघाला हे कळले की आपण अनिवार्यपणे पुल शॉट खेळू तर ते आपल्याला निशाण्यावर धरतील.”
महत्वाच्या बातम्या
वॉर्नरच्या सुपरमॅन क्षेत्ररक्षणाची विलियम्सनने केली नक्कल; स्वत: ऑसी फलंदाजाने फोटो केला शेअर
विकेट मिळेना म्हणून विराट-शुबमनने अवलंबला स्लेजिंगचा मार्ग, किंवी फलंदाजांना ‘असं’ उकसावलं
कोहलीला तंबूत धाडणाऱ्या जेमिसनने गायले त्याचे खूप गुणगान, पाहा काय म्हणाला