भारताला आठव्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारूण पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरूवारी (10 नोव्हेंबर) इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. भारताच्या या पराभवाने चाहते तर दुखी झालेच, तर माजी क्रिकेटपटूंनी रोहित शर्मा आणि बाकी खेळाडूंवर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या या पराभवावर बोलताना कठोर एका दिग्गजाने प्रश्न उठवत आयपीएलमध्ये खेळताना कुठे जातो वर्कलोड, असे विचारले.
भारताचे माजी सलामीवीर आणि विश्वविजेते सुनील गावसकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “बदल होणार, जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही तेव्हा बदल निश्चितच होणार. आता संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी जातो आहे. त्यामध्ये भारताच्या संघात बदल पाहायला मिळाले. किर्ती आणि मदन यांनी बरोबर म्हटले, जेव्हा वर्कलोडच्या गोष्टी होतात ना तेव्हा केवळ भारतासाठी खेळताना हे समोर येते.”
“तुम्ही आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळता. तेव्हाही तुम्ही खूप प्रवास करता, मागील आयपीएल केवळ चार मैदानावंर झाले. बाकीमध्ये तर तुम्ही इकडे-तिकडे गेला होता ना. तेव्हा थकवा नाही जाणवत? तेव्हा वर्कलोड नाही येत? जेव्हा भारतासाठी खेळण्याची वेळ येते तेव्हा वर्कलोड येतो. हे जेव्हा समोर येते जेव्हा संघ छोट्या दौऱ्यावर जातो,” असेही गावसकर यांनी पुढे म्हटले आहे.
आपण पाहिले आहे की काही खेळाडूंना विश्रांती दिली जाते, ते आयपीएलचे संपूर्ण हंगाम खेळतात. काहींना तर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागते. आताच्या काळात पाहिले तर, काही खेळाडू क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळताना फारच कमी दिसले आहेत. तसेच काहींचा फिटनेस इतका अप्रतिम आहे की ते फारच कमी वेळा दुखापतग्रस्त झाले आहेत, मात्र कधी कधी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठीही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाते.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
वनडे- शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, रिषभ पंत, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, उमरान मलिक, कुलदीप सेन.
टी20- शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता त्यांची वेळ आली! या दोन नावांपासून सुरू होणार भारतीय संघातील बदलांना सुरुवात?
इंग्लंड जिंको वा पाकिस्तान, वेस्ट इंडिजचा ‘त्या’ बलाढ्य विक्रमाची बरोबरी होणारच; पाहा तो ‘खास’ रेकॉर्ड