कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावांचा टप्पा पार करणारे जगातील पहिले फलंदाज सुनील गावसकरांनी १० जुलैला आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित एके काळी गावसकरांच्या प्रेमात पडली होती.
खरंतर क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक गजबच नातं राहिलं आहे. खेळाडूंचं बॉलिवूड अभिनेत्रींशी असलेलं लिंक- अप आता साधारण बाब आहे. असेच काहीसे लिटल मास्टर गावसकरांचेही (Sunil Gavaskar) होते. माधुरी (Madhuri Dixit) गावसकरांना खूप पसंत करत होती.
याचा खुलासा माधुरीने १९९२ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते तसेच याचा उल्लेख फ्रीप्रेसजर्नल डॉट इननेही केला आहे. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाखतीत माधुरीने म्हटले होते, की तिला सुनील गावसकरांच्या मागे धावायचे आहे आणि ते तिला खूप सेक्सी वाटतात.
त्यावेळी माधुरीचे वय केवळ २५ वर्ष होते, तर गावसकरांचे वय ४३ होते. तसेच गावसकरांनी निवृत्ती घेतली होती. परंतु ते देखणे होते आणि त्यामुळे माधुरीला ते आवडत होते.
२०१८च्या आयपीएल दरम्यान माधुरी आणि गावसकरांची भेटही झाली होती. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गावसकरांबरोबर फोटो शेअर केला होता. तो फोटो माधुरीच्या ५१व्या वाढदिवसादिवशी आयपीएलच्या प्री मॅच शो ‘एक्स्ट्रा इनिंग्स’ दरम्यान घेण्यात आला होता.
https://www.instagram.com/p/Bi3vtCDHZiu/?utm_source=ig_web_copy_link
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतीय संघाचे सर्वाधिक शिकलेले ७ क्रिकेटर्स; एक आहे इंजीनिअर, तर दुसरा…