सुनील गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळ्या केल्या. त्यामुळे ते अनेकांचे आदर्शही बनले. गावसकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 6 ते 10 मार्चदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते.
आता त्यांच्या या पदार्पणाला येत्या मार्च महिन्यात तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर गावसकर यांच्या नावे एक कायमस्वरूपी बॉक्स बनवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध 6 मार्च 1971 रोजी पदार्पण करणाऱ्या सुनील गावसकर यांनी पहिल्या डावात 65 तर दुसऱ्या डावात नाबाद 67 धावांची खेळी केली होती. आपल्या पहिल्याच मालिकेत गावसकरांनी संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवून देत तब्बल 774 धावा केल्या होत्या. कोणत्याही फलंदाजाद्वारे आपल्या पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या समितीने मागील वर्षीच हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. 2011साली वानखेडे स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आल्यामुळे गावसकर यांच्या नावे असलेला बॉक्स नामशेष झाला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार गावसकर शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यावेळी एमसीए अध्यक्ष विजय पाटील व सचिव संजय नाइक यांनी गावसकरांना 10 ते 12 प्रेक्षक क्षमता असलेला बॉक्स दाखवला, ज्याला गावसकरांचे नाव देण्यात येणार आहे. या सर्व घटनेबद्दल बोलताना एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “आम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या गावसकरांना सन्मानित करणार आहोत व गोष्टीचा आम्हाला आनंद आहे.”
गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत 125 कसोटी सामने खेळताना 10122 धावा काढल्या. यात त्यांच्या 34 शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत 10 हजार धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले खेळाडू होते. तसेच त्यांनी 108 वनडे सामने खेळताना 3092 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ एक सामनावीर अन् विराट कोहली टाकेल तब्बल ५ दिग्गजांना मागे
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून परतलेल्या नटराजनने केलं मुंडन, फोटो भन्नाट व्हायरल
मायदेशातील सरासरी डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही सरस, तरी मयंकला इंग्लंडविरुद्ध संधी मिळणे कठीण; कारण….






