भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी संघ व्यवस्थापन आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंवर निराजी व्यक्त केली आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह मागच्या काही महिन्यांमध्ये वारंवार विश्रांती घेताना दिसले आहेत. याच पार्श्वभूमीवर गावसकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुडच्या वर्षी भारताता आयसीसीचा टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीनेही गावसकरांनी संघाला काही सुचना केल्या आहेत.
भारतीय संघ (Team India) काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरला. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले असून संघावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. विश्वचषक स्पर्धेनंतर संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना विश्रांती दिली गेली आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे () संघातून बाहेर आहे. या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थिती हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 मालिका 1-0 अशा अंतराने जिंकली. पण एकदिवसीय मालिकेत मात्र शिखर धवन याच्या नेतृत्वातील संघ 0-1 अशा अंतरान मागे पडला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात संघाला वरिष्ठ खेळाडूंची कमी स्पष्टपणे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गावसकरानी संघ व्यवस्थापनाला काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. त्यांच्या मते पुढच्या वर्षा भारतात विश्वचषक खेळला जाणार आहे आणि तोपर्यंत कोणत्याही खेळाडूला विश्रांती दिली नाही पाहिजे. तो म्हणाले की, “एकदिवसीय विश्वचषकाला आता एक वर्षापेक्षा कमी काळ राहिला आहे. अशात मी म्हणेल, संघ व्यवस्थापनाने वरिष्ट फलंदाजांना विश्रांती नाही दिली पाहिजे. प्रयत्न हाच असला पाहिजे की, फलंदाजांनी जास्तीत जास्त एकत्र खेळावे. जेणेकरून त्यांच्यात जास्तीत जास्त समजूतदारपणा आणि ताळमेळ सुधारेल.”
“मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी होणे गरजेचे असते. त्यांच्यातील ताळमेळ आणि असजूतधारपणा सुधारू झाला पाहिजे. या गोष्टी तेव्हा शक्य होतील, जेव्हा फलंदाज जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत खेळतील,” असे सावसकर पुढे बोलताना म्हणाले. दरम्यान, भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुलने मागच्या एका वर्षात खूपच कमी वेळा एकत्र क्रिकेट खेळले आहे. राहुल दुखापतीमुळे बरेच दिवस संघाबाहेर होता, तर रोहित वारंवार विश्रांती घेताना दिसला आहे. अशात आगामी विश्वचषकापूर्वी संघाची घडी पुन्हा बसवणे गरजेचे बनले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपैक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!
‘या’ गोलंदाजासोबत खेळण्याचा मला फायदाच, अर्शदीप सिंगने सांगितले चकित करणारे नाव