---Advertisement---

पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधारापुढे असतील बरीच आव्हाने, माजी कॅप्टनने केले सावधान

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 7:38 PM
Mayank Agarawal
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. २६ मार्चपासून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामन्याने आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होणार आहे. या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाने मयंक अगरवाल याला नवा कर्णधार घोषित केले आहे. पंजाब संघाने यंदाच्या हंगामासाठी केएल राहुलला संघातून रिलीज केले होते.

मात्र भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आगामी हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच पंजाब संघाच्या (Punjab Kings) नव्या कर्णधाराला (Punjab Kings New Captain) चेतावणी दिली आहे. नव्या कर्णधारासाठी हे काम सोपे नसेल, असे गावसकरांचे म्हणणे आहे.

पंजाब किंग्ज आतापर्यंत केवळ २ वेळा, २००८ आणि २०१४ ला प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि सातव्या हंगामात उपविजेता राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील पंजाब संघाचे प्रदर्शन अतिशय सुमार राहिले आहे.

पंजाब संघाबद्दल आपले विचार मांडताना गावसकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, “मयंकसाठी (Mayank Agarwal) हे सोपे असणार नाही. पंजाबचा संघ एक असा संघ आहे, ज्यांना मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यातील प्रतिभेला न्याय देता आलेला नाही. याचे कारण आपल्या कोणालाच माहिती नाही. टी२० स्वरूपात कधी-कधी आपल्याला नशिबाचीही साथ असावी लागते. परंतु, हा संघ फक्त चांगला खेळू शकतो. कारण मी चुकीचा नसेल तर, त्यांचे अंतिम सामन्यात पोहोचणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यात बादफेरी सामने किंवा अंतिम सामन्यात जागा मिळवण्यासाठी उत्साह आहे. आणि कोणाला माहिती आहे, त्यांनी एकदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवल्यास ते ट्रॉफीही जिंकतील.” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---