आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी झंझावाती कामगिरी केल्यानंतर वेगवान गोलंदाज उमरान मलिकने भारतीय टी२० संघात स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग आहे, परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. भारतीय संघाने हे दोन्ही सामने गमावले असून आता आणखी तीन सामने खेळायचे आहेत. या सामन्यांपूर्वी भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी उमरान मलिकचे समर्थन केले आणि सांगितले की त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याची वेळ आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी उमरान मलिकचा (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा, असे गावस्कर यांचे मत आहे. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “भारताने उमरान मलिकला पदार्पणाची संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर उमरान हा एकमेव क्रिकेटर आहे ज्याला खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
गावसकर पुढे म्हणाले की, “सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिला खेळआडू होता ज्याला पाहून मी उत्सुक होतो आणि आता दुसरा खेळाडू उमरान मलिक आहे.” उमरानच्या वेगवान गोलंदाजी आणि विकेट घेण्याच्या क्षमतेबद्दल गावस्कर यांनी नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे. पुन्हा एकदा त्याने उमरानचे कौतुक केले आणि सांगितले की, “भारताने पहिले दोन टी२० सामने गमावले आहेत, त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये भारताने आता या खेळाडूला आजमावले पाहिजे. त्याने तिसरा सामना खेळायला हवा.”
दरम्यान, उमरान मलिकची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा चेंडूचा वेग आणि तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांविरुद्ध भारताचे सर्वात मोठे शस्त्र ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी गेल्या दोन सामन्यांत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले असून भारतासाठी उमरानाएवढी वेगवान गोलंदाजी कोणीही करत नाही. उमरान मलिकमध्ये १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, जी कोणत्याही संघाच्या फलंदाजांना त्रास देऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऋतुराजला संघात पुन्हा स्थान मिळणे कठीण!, ‘ही’ आहेत त्याची प्रमुख कारणे
व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण