Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सनीज् मास्टरक्लास! फिरकीविरूद्ध अडखळणाऱ्या भारतीय संघाला गावसकरांच्या टीप्स, म्हणाले…

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI/ICC

Photo Courtesy: Twitter/BCCI/ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या पाहायला मिळाल्या होत्या. अशा खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला फिरकीविरुद्ध कसे खेळावे, याबाबतचा सल्ला दिला आहे.

उभय संघातील पहिला सामना भारतीय संघाने नागपूर येथे एकतर्फी आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पिछाडीवरून पुनरागमन करत विजय संपादन केला. तर, ऑस्ट्रेलियाने इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात पलटवार करत विजय मिळवला. विशेष म्हणजे हे तीनही सामने केवळ तीन दिवसांच्या आत निकाली निघाले.‌ या तीनही सामन्यात केवळ भारतच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी देखील भारतीय संघाला सळो की पळो करून सोडले. खास करून भारताचे प्रमुख फलंदाज फिरकी समोर अडखळताना दिसले. भारतीय संघाची ही कमजोरी पाहता गावसकर म्हणाले,

“चेंडू ज्यावेळी जास्त फिरकी घेतो, तेव्हा तुम्ही बॅट वरच्या बाजूने पकडायला हवी. हलक्या हाताने बॅट पकडल्यास तुम्ही बाद होण्याची शक्यता कमी होते. तसेच, फ्रंट फूट डिफेन्स हे यावेळी जास्त कामी येते.”

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही प्रामुख्याने फिरकीला मदतगार असलेली दिसून येते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी मिळणार की, फलंदाजांना फायदा करून देणारी हे पाहावे लागेल.

(Sunil Gavaskar Giving Tips To Team India For Batting Against Spinners)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा


Next Post
Kookaburra-And-SG-And-Dukes

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरले जातात 'हे' तीन बॉल, प्रत्येक क्रिकेटप्रेमीला कारण माहितीच पाहिजे

Gubby-Allen-And-Harold-Larwood

तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या रक्ताचे भुकेले होते इंग्लिश बॉलर्स, डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी आखलेला डाव

Jeff-Thomson-And-Chetan-Chauhan

जेंटलमन्सच्या खेळात ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिलेली भारतीय सलामीवीराला धमकी, पण मागे हटेल तो भारतीय कसला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143