इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने संमिश्र कामगिरी केली. स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करूनही आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आले नाही. त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहत स्पर्धेचा शेवट केला. या स्पर्धेत आरसीबीकडून विराट कोहली यानेही जबरदस्त फलंदाजी केली. तो आरसीबीसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अशात सुनील गावसकर यांनी विराटविषयी विचित्र विधान केले आहे.
‘विराटची जागा त्याचा फॉर्म ठरवेल’
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, विराट कोहली (Virat Kohli) याला टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत संघात सामील करण्याचा निर्णय आताच घेणे हे खूप घाईचे होईल. ते पुढे असेही म्हणाले की, “पुढील वर्षी टी20 विश्वचषकापूर्वी आयपीएल खेळले जाईल. या लीगमध्ये आणि त्यावेळी विराट कोहलीचा चालू फॉर्म पाहून हे ठरवले पाहिजे की, त्याची टी20 विश्वचषकात जागा बनते की नाही. सध्या याविषयी बोलण्याची काहीच गरज नाहीये.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “जर तुम्ही मला विचाराल की, या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीची जागा बनते का, तर मी म्हणेल हो. त्याची संघात जागा बनते.”
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे विराट
टी20 विश्वचषक 2022च्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर अनेकांनी असे म्हटले होते की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुढील टी20 विश्वचषकातून बाहेर केले जाऊ शकते. मात्र, आयपीएल 2023 हंगामात विराट कोहली याने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने 14 सामने खेळताना 53.25च्या सरासरीने 639 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांचाही समावेश होता.
डब्ल्यूटीसी खेळणार विराट
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात पार पडणार आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विराट कोहली याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (sunil gavaskar on virat kohli t20 world cup place read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL संपल्यानंतर अफगाणिस्तानला जाता जाता गंभीरविषयी ‘हे’ काय बोलून गेला नवीन, एक नजर टाकाच
‘रोहित अंडररेटेड कॅप्टन…’, मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या ‘हिटमॅन’विषयी गावसकरांचे धक्कादायक भाष्य