आशिया चषक 2023च्या आयोजनाविषयी अंतिम निर्णय या आठवड्याच्या शेवटी घेतला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सचिव जय शहा यांनी रविवारी (28 मे) या संदर्भात महत्वाची बैठक बोलावली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना पाहण्यासाठी श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशात यावेळी बीसीसीआय आणि हे तीन क्रिकेट बोर्ड मिळून आशिया चषकाविषयी महत्वाचा निर्णय घेऊ शकतात.
इंडियन प्रीमियर लीग 2023च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने जागा पक्की केली आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर जिंकणारा संघ सीएसकेविरुद्ध रविवारी आयपीएळचा अंतिम सामना खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित केला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत पाहण्यासाठी बीसीसीआयकडून श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डांच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मात्र हा सामना पाहण्यासाठी उपस्थित नसतील. अशात अहमदाबादमध्ये उपस्थित असणाऱ्या चार क्रिकेट बोर्डांमध्ये बैठक होऊन आशिया चषकाविषयी महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बीसीसीआय सचिव जय शाह () यांनी याविषयी माहिती दिली. शाह म्हणाले, “आशिया चषकाच्या यजमानपदाविषयी झालेल्या निर्णयाला अंतिम स्वरूप अद्याप दिले गेले नाहीये. आम्ही आयपीएलमुळे व्यस्त आहोत. पण श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे वरिष्ट अधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येत आहेत. यादरम्यान आमच्यात चर्चा होणार आहे आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, मागच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषकवेळीच जय शाहांनी आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. शाह आजही आपल्या शब्दावर कायम असल्याचे दिसते. ठरल्याप्रमाणे आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, बीसीसीआय कुठल्याही परिस्थितीत आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार नाहीये. अशात पीसीबीकडून हायब्रिड मॉडेलही सादर केले गेले, ज्यात भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याची योजना आखली होती. पण हे मॉडेलही बीसीसीआयला मान्य नसल्याचे बोलले जात आहे.
काही आठवड्यांपूर्वी अशा बातम्याही आल्या होत्या की, आशिया चषका हायब्रिड मॉडेलवर आयोजित करण्यासाठी श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डांना पीसीबीला समर्थन दिले आहे. पण याविषयी कुठलीच ठोस माहिती समोर आली नव्हती. अशात आयपीएलच्या अंतिम सामन्यात बीसीसीआय अधिकारी इतर तीन क्रिकेट बोर्डांशी काय चर्चा करतात, हे महत्वाचे ठरणार आहे. (An important meeting between India, Afghanistan, Sri Lanka and Bangladesh cricket boards regarding the Asia Cup will be held during the IPL 2023 finals.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंजीनियर ते क्रिकेटर… असा आहे मुंबईचा तारणहार आकाश मढवालचा क्रिकेट प्रवास
मधवालचे आकाशासारखे मन! म्हणाला, “माझी बुमराहसोबत तुलना नको, त्याचा दर्जा वेगळा”