---Advertisement---

ASIA CUP 2023 । सॅमसन-चहलला संधी न मिळण्यामागे आहे ‘हे’ कारण, स्वतः गावसकरांनी दिले स्पष्टीकरण

On: मंगळवार, ऑगस्ट 22, 2023 3:49 PM
Sanju Samson and Yuzvendra Chahal
---Advertisement---

आशिया चषक 2023 साठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा 21 ऑगस्टला करण्यात आली. या संघात काही खेळाडूंची जागा निश्चित मानली जात असताना त्यांची नावे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. संघाची घोषणा झाल्यानंतर लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन या दोन मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला नाही. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी निवड समितीच्या या निर्णयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आशिया चषक संघाच्या निवडीनंतर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी इंडिया टुडेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संजू सॅमसन (Sanju Samson) याला आशिया चषक स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्य संघात स्थान मिळू शकले असते, परंतु वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी खूप निराशाजनक होता. सॅमसनला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु, संजू फक्त 29 वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे संघात पुनरागमन करण्याच्या अनेक संधी आहेत.”

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर म्हणाले की, “चहलची निवड न झाल्याचे कारण म्हणजे गोलंदाजीव्यतिरिक्त तो फलंदाजीत विशेष योगदान देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला संघात स्थान देणे कठीण होते. संघ कुलदीप यादव हा चहलपेक्षा खालच्या फळीत चांगला फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याला पसंती देण्यात आली.”

संजू सॅमसनचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे
भारताच्या आशिया चषक 2023 साठी घोषित केलेल्या 17 सदस्यीय संघाव्यतिरिक्त, संजू सॅमसनचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले. परंतु तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे सॅमसन राखीव खेळाडू म्हणून खेळणार आहे.

आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा. प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन. (sunil gavaskar reaction on sanju yuzvendra chahal and sanju samson not selected for asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या- 
पुना क्लब फिटनेस लीग 2023 स्पर्धेस आजपासून प्रारंभ, स्पर्धेत १० संघांमध्ये १७५ खेळाडू सहभागी
विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन वेळी बिश्नोईला का आठवला शाहरुख खान? रिंकूशी झालेल्या चर्चेत केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---